Join us

‘हाऊसफुल्ल ३’ च्या दिग्दर्शकाचा जीव धोक्यात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2016 10:18 IST

नर्गिस फाखरी ही अत्यंत मजेशीर आणि हॅपी गो लकी अभिनेत्री आहे. तिला सेटवरही केवळ शूटिंग करणे आणि पॅक अप ...

नर्गिस फाखरी ही अत्यंत मजेशीर आणि हॅपी गो लकी अभिनेत्री आहे. तिला सेटवरही केवळ शूटिंग करणे आणि पॅक अप करून जाणे एवढेच आवडत नाही. तर ती अनेक गमतीजमती करायलाही मागेपुढे पाहत नाही. तिने नुकताच एक फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे.यात ती तिचे ‘हाऊसफुल्ल ३’ चे दिग्दर्शक यांचा गळा दाबत आहे. फोटो शेअर करताना तिने कॅप्शन टाक ले आहे की, ‘ कि लिंग वन आॅफ माय डायरेक्टर्स’ हा फोटो अत्यंत फनी प्रकारचा आहे. ती हाऊसफुल्ल ३ साठी शूटिंग करत असून हा हाऊसफुल्लचा तिसरा भाग आहे. पहिले दोन चित्रपट साहिद-फरहाद या दिग्दर्शकांनी साकारले आहेत.यात तिच्यासोबत अभिषेक बच्चन, अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम हे दिसतील. नर्गिसला हे वर्ष अत्यंत बिझी गेले असून हाऊसफुल्ल ३ सोबतच ती बँजो, हेराफेरी ३, ढिशूम आणि अजहर यातही ती दिसणार आहे.