Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भट्टच्या आयुष्यात पुन्हा एकदा एक्स बॉयफ्रेंडची एन्ट्री ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 15:11 IST

बॉलिवूडमध्ये रोज ब्रेकअप आणि पॅचअपच्या बातम्या येत असतात. त्यामुळे त्यात आताकाही नवीन राहिलेले नाही. मिनिटा- मिनिटाला इकडे जोड्या बनतात ...

बॉलिवूडमध्ये रोज ब्रेकअप आणि पॅचअपच्या बातम्या येत असतात. त्यामुळे त्यात आताकाही नवीन राहिलेले नाही. मिनिटा- मिनिटाला इकडे जोड्या बनतात आणि तुटतात. सध्या बी टाऊनमध्ये बॉलिवूडची चुलबुली गर्ल आलिया भट्टच्या ब्रेकअपची चर्चा आहे. आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्राने आपले नातं कधीच अधिकृतपणे स्वीकारले नाही. पण मीडियांच्या कॅमेऱ्यासमोर नेहमीच दोघे एकत्र आले. दोघांनी करण जोहरच्या 'स्टुडण्ट ऑफ द इयर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र आता दोघांमध्ये काही तरी बिनसलं असल्याचे समजते आहे. मागच्या काही दिवसांपासून आलियाचे तिचा एक्स बॉयफ्रेंड अली दादरकर बरोबरचे फोटो व्हायरल झाले आहेत. अली आणि आलियाच्या भेटीगाठी पुन्हा वाढल्या आहेत. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आलिया अलीला डेट करत होती मात्र ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे. मात्र बॉलिवूडमध्ये आल्यानंतर अली आणि आलियाचे ब्रेकअप झाले. सिद्धार्थ आणि आलियाला एकता कपूरच्या दिवाळीच्या पार्टीत एकत्र दिसले होते. त्यांना लोकमतच्या मस्ट स्टायलिश अॅवॉर्ड सोहळ्यात सिद्धार्थने आधी हजेरी लावली तर सिद्धार्थ पाठोपाठ आलिया आली. सध्या आलिया आपल्या मित्राच्या लग्नात बिझी आहे. यादरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. यात आलिया तिच्या एक्सबॉयफ्रेंड सोबत पोझ देताना दिसते आहे.  सोमवारी आलिया वांद्रे येथील सिक्वल बिस्ट्रो अॅण्ड ज्युस बारमध्ये अलीसोबत दिसली. अलीचा जन्म मुंबईत झाला. जुहूतील जमनाबाई नरसी स्कूलमध्ये त्याचे शालेय शिक्षण झाले. आलिया व अली दोघेही स्कूल फ्रेन्ड आहेत. मुबंईत राहणारा अली आता लंडनला शिफ्ट झाला आहे. लंडनमधून त्यांने  मॅकॅनिकल इंजिनिअर डिग्री घेतली आहे.ALSO RAED :  ​ रणवीर सिंगने खराब केला आलिया भट्टचा लाखोंचा ड्रेस!लवकरच आलियाचा  ‘राजी’चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात ती एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. जिचा विवाह पकिस्तानी लष्कर अधिकाºयाशी होतो. यात तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत विकी कौशल दिसणार आहे. मेघना गुलजारने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.