Join us

​पत्रलेखा म्हणते, हंसल मेहता माझे गुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 04:32 IST

बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सध्या झटत असलेली नवोदित अभिनेत्री पत्रलेखा ही दिग्दर्शक हंंसल मेहता यांना गुरु मानते. ...

बॉलिवूडमध्ये स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी सध्या झटत असलेली नवोदित अभिनेत्री पत्रलेखा ही दिग्दर्शक हंंसल मेहता यांना गुरु मानते. हंसल मेहता यांच्या ‘सिटीलाईट’ या चित्रपटाद्वारे पत्रलेखाने आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पत्रलेखाचा या चित्रपटातील अभिनयाची मोठी प्रशंसा झाली होती. पत्रलेखातील प्रतिभा ओळखणारे हंसल मेहता बॉलिवूडमधील पहिली व्यक्ति आहेत. त्याचमुळे पत्रलेखाने त्यांना स्वत:चे गुरु मानले आहे. आता कुठलाही चित्रपट असो, हंसल यांचा सल्ला घेतल्याशिवाय पत्रलेखा त्याला होकार देत नाही. आता गुरु-शिष्याची ही जोडी काय नवीन घडवते, ते बघूच!