पूरब गिरवतोय मार्शल आर्ट्सचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 04:53 IST
मल्टी टॅलेंटेड पूरब कोहली आता 'एअरलिफ्ट' चित्रपटात अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. अक्षय कुमार त्याला मार्शल आर्ट्सचे धडे देतोय. ...
पूरब गिरवतोय मार्शल आर्ट्सचे धडे
मल्टी टॅलेंटेड पूरब कोहली आता 'एअरलिफ्ट' चित्रपटात अक्षय कुमार सोबत दिसणार आहे. अक्षय कुमार त्याला मार्शल आर्ट्सचे धडे देतोय. जेव्हा त्याला कळाले की, अक्षय कुमार उत्तम मार्शल आर्ट्स जाणतो.तेव्हा त्याने स्वत:लाही काही धडे द्यावेत यासाठी प्रयत्न केले. पूरब सध्या लंडनमध्ये असून त्याला नुकतेच बाळ झाले आहे. त्यामुळे वडील असल्याचा आनंद तो लुटत आहे. या महिन्याच्या शेवटी तो लंडनहून परत येईल. आल्यानंतर पुन्हा तो मार्शल आर्ट्सच्या क्लासेसला जॉईन करेल. त्याने आत्तापर्यंत मॉडेलिंग, व्हिडिओ जॉकेईंग आणि आता मार्शल आर्ट्स.