'महेंद्रसिंह धोनी - द अनटोल्ड स्टोरी' सिनेमातून मनं जिंकलेल्या दिशाचे सोशल मीडियावर १ कोटी ३० लाख फॉलोअर्स आहेत. मात्र तिची सर्वाधिक चर्चा तिच्या कामापेक्षा टायगरसह असलेल्या अफेअरमुळे जास्त होते. टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्या अफेअरची चर्चा नेहमीच रंगलेली असते. त्यांना अनेक वेळा रेस्टॉरंटमध्ये अथवा मल्टीप्लेक्समध्ये पाहाण्यात येते. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त असल्याचे म्हटले जाते. कधी त्यांच्या अफेअरच्या बातम्या येतात तर कधी ब्रेकअपच्या.
मध्यंतरी दोघांचेही ब्रेकअप झाल्याच्या चर्चा सुरू होती. मात्र नेमकं या दोघांमध्ये मैत्रीपेक्षाही दुसरं नातं आहे का याविषयी दोघांनीही प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणेही कधीच कबुली दिली नाही. मात्र टायगरचे नाव घेतले तर दिशा पटानीवरही चर्चा होते. मुळात टायगर दिशाच्या आयुष्यात येण्यात आधी एक टीव्ही अभिनेतासह दिशाची चांगली मैत्री होती. करिअरच्या सुरूवातीलाच दिशा पाटणी टीव्ही अभिनेता पार्थ समथनला डेट करत होती.
पार्थ आणि दिशाचे जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र दोघांचे हे नाते फार काळ काही टिकले नाही. २०१३ मध्ये दोघांनी एकमेकांना जवळपास वर्षभरासाठी डेट केलं. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले दोघांनीही आपले वेगळे मार्ग धरले.
यानंतर दिशाने तिच्या सिनेसृष्टीतील पदार्पणासाठी अधिक मेहनत घेतली आणि या तिच्या प्रवासात तिला टायगर श्रॉफ भेटला. यासोबतच दुसरीकडे पार्थ त्याची सहकलाकार एरिका फर्नांडिसला डेट करत असल्याच्याही चर्चा आहेत.पार्थ आणि एरिका दोघेही एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की २' मध्ये एकत्र झळकले होते.