Join us

लेदर जॅकेट, डोळ्यावर गॉगल; समांथा प्रभूचा 'सिटाडेल'मधला डॅशिंग लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 20:06 IST

Samantha Ruth Prabhu : अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिने दक्षिणात्य चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका केल्यानंतर ती आता ‘सिटाडेल’ या हिंदी सिरीजमध्ये दिसणार आहे.

'फॅमिली मॅन २'मध्ये खलनायिका साकारल्यानंतर सध्या 'शाकुंतलम'मध्ये स्वप्नसुंदरी शकुंतला बनल्यामुळे चर्चेत असलेली समांथा रुथ प्रभू आणखी एका सिरीजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्या जोडीला वरुण धवन आहे. मध्यंतरी तब्येतीमुळे समांथाने या प्रोजेक्टला नकार दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण ती अजूनही या वेबसीरिजचा एक भाग आहे. अमेझॉन प्राईमने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

अभिनेत्री समांथा रूथ प्रभू हिने दक्षिणात्य चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका केल्यानंतर ती आता ‘सिटाडेल’ या हिंदी सिरीजमध्ये दिसणार आहे. अमेझॉन प्राईमने तिच्या लूकची पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिने लेदर जॅकेट, डोळ्यावर गॉगल आणि जीन्स अशा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टला कॅप्शन दिला आहे मिशन सुरु झालं आहे. आम्ही ‘सिटाडेलच्या भारतीय व्हर्जनसाठी तयार आहोत. 

 याबाबत समांथा म्हणाली की, जेव्हा राज आणि डीके यांनी या प्रोजेक्टसाठी संपर्क साधला, तेव्हा मी त्वरित त्यांच्यासोबत काम करण्याच्या निर्णय घेतला. 'द फॅमिली मॅन'मध्ये मी या टीमसोबत काम केलं असल्यानं हे माझ्यासाठी घरवापसीसारखं आहे. सिटाडेल यूनिवर्स आणि जगभरातील प्रॉडक्शन्समधील परस्परसंबंधित कथानक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, भारतीय इंस्टॉलमेंटच्या स्क्रिप्टनं मला उत्साहित केलं. 

राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी भारतात बनवलेल्या या अनटायटल्ड सिटाडेल सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. सीता आर. मेनन आणि राज-डीके यांनी या लोकल इंस्टॉलमेंट सिरीजचं सहलेखनही केलं आहे. सध्या मुंबईमध्ये या सिरीजच्या प्रोडक्शनचं काम सुरु असल्याचं समजतं. यानंतर संपूर्ण युनिट उत्तर भारतासह सर्बिया आणि दक्षिण आफ्रिकेतल्या आंतरराष्ट्रीय लोकेशन्सवर जाणार आहे.

टॅग्स :समांथा अक्कीनेनी