Join us
Daily Top 2Weekly Top 5

​जाणून घ्या, ‘लायन चाईल्ड’ सनी पवारबद्दल काही गोष्टी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 15:53 IST

नुकत्याच पार पडलेल्या गोल्डन ग्लोब अवार्ड्स सोहळ्यात एका भारतीय बालकलाकाराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.  को-स्टार देव पटेलसोबत सनी स्टेजवर ...

नुकत्याच पार पडलेल्या गोल्डन ग्लोब अवार्ड्स सोहळ्यात एका भारतीय बालकलाकाराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.  को-स्टार देव पटेलसोबत सनी स्टेजवर आला आणि टाळ्यांच्या कडकडाटांनी त्याचे जोरदार स्वागत केले. होय, आम्ही बोलतोय, ते ‘लायन’ या हॉलिवूडपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा मराठमोळा बालकलाकार सनी पवार याच्याबद्दल. ‘गोल्डन ग्लोब अवार्ड्स’ सोहळ्यात ‘लायन’ चित्रपटाला पुरस्कार मिळाला नाही. पण सनी पवार व देव पटेल या दोन्ही स्टार्सला मिळालेले स्टँडिंग ओवेशन आणि शाबासकीची थाप कुठल्या अवार्डपेक्षा कमी नव्हते. ‘लायन’चे दिग्दर्शक गार्थ डेव्हीस याला आपल्या चित्रपटासाठी योग्य कलाकार शोधण्यासाठी मुंबईत चार महिने तळ ठोकावा लागला होता. ‘लायन’मध्ये सनीने सुरू नामक मुलाची भूमिका साकारली आहे.  आपल्या भावासह रेल्वे स्टेशनवर पोहोचलेला पाच वर्षाचा गरीब सरू हा मुलगा चुकून रेल्वेमध्ये झोपतो आणि गाडी सुटते. जाग येते तेव्हा तो खूप लांब पोहोचलेला असतो. त्याचा भाऊ शोध घेतो पण तोपर्यंत सरू कोलकात्याला पोहोचतो. कोलकात्याच्या रस्त्यांवर पाच वषार्चा  सरू भटकत असतो. जगण्यासाठी खूप संघर्ष त्याला करावा लागतो. त्यानंतर एक आॅस्ट्रेलियन कुटुंब त्याला दत्तक घेते. २५ वषार्नंतर तो आपल्या हरवलेल्या कुटुंबियांचा शोध घ्यायला सुरूवात करतो अशी या चित्रपटाची कथा आहे. याच चिमुकल्या सनी पवारबद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स आम्ही  तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...भारत पिंजून काढल्यावर मिळाला सनी पटेल‘लायन’चे दिग्दर्शक गार्थ डेव्हीस याला आपल्या चित्रपटातील सुरु नामक पात्रासाठी एका वेगळ्याच चेहºयाचा शोध होता. यासाठी गार्थने अक्षरश: भारत पिंजून काढला. अनेक शाळांमध्ये तो गेला. दोन हजारांवर व्हिडिओ टेप त्याने पाहिले. असंख्य बालकलाकारांच्या आॅडिशन्स घेतल्या. पण जेव्हा दुसºया वर्गात शिकणारा सनी पवार गार्थसमोर आला. तेव्हा कुठे गार्थचा शोध संपला. सनीचे सुंदर डोळे आणि त्यातील चमक पाहून हाच माझा सरू, असे गार्थ म्हणाला आणि ही भूमिका सनीच्या पदरात पडली. सनीला इंग्रजी बोलता येत नव्हते‘लायन’मध्ये सनी फाडफसड इंग्रजी बोलताना दिसतोय. पण प्रत्यक्षात त्याची या हॉलिवूडपटासाठी निवड झाली तेव्हा त्याला अजिबात इंग्रजी बोलता येत नव्हते. त्यामुळे चित्रपटाच्या क्रू मेंबर्सनी सनीसाठी चित्रपटाचे एक बुक व्हर्जन बनवले. चित्रपटाचे संपूर्ण संवाद फोनेटिकली लिहून सनीने ते पाठ केलेत. सनी याबद्दल सांगतो, मी चित्रपटाचे संवाद फोनेटिकली लिहून पाठ केलेत. क्रू मेंबर्सनी मला यात प्रचंड मदत केली. ते इंग्रजी संवाद उच्चारत आणि मी ते हिंदीत जशेच्या तसे लिहून घेतले. यानंतर त्याची प्रॅक्टिस केली. अनेक इमोशल सीन्स गार्थने मला साईन लॅग्वेजद्वारे समजावून सांगितले. तेही अतिशय प्रेमाने. त्यामुळेच मी हा चित्रपट करू शकलो.सनीला बनायचेयं सुपरहिरो‘लायन’मधील सनीच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. सध्या सनीच्या खात्यात केवळ एक हॉलिवूडपट जमा आहे. पण आता सनीला सुपरहिरो बनायचे वेध लागले आहे. मला सुपरहिरोची भूमिका साकारायचीयं. बॉलिवूडमधला ‘क्रिश’ हा माझा आवडता चित्रपट आणि हृतिक माझा आवडता स्टार. एकदिवस मी सुद्धा अशाच चित्रपटात सुपरहिरो बनेल, असे सनी म्हणाला. ‘लायन’मध्ये सनीने काही अ‍ॅक्शन दृश्ये साकारली आहेत. यासाठी त्याला खास ट्रेनिंग देण्यात आले होते.Also Read : सनीने घेतली ओबामांची भेटमराठमोळया सनीचा गोल्डन ग्लोबमध्ये जलवा​ सनीने घेतली ओबामांची भेटअभिनेता नाही बनलो तर पोलिस बनेलसनी पवारला अभिनेता बनायचे आहे. पण यदाकदाचित अभिनेता बनू शकला नाही तर सनीला पोलिस बनायला आवडेल. मला हिरो बनायचे आहे. पण हिरो नाही बनू शकलो तर पोलिस बनेल. अ‍ॅक्टिंगसोबतच अभ्यासही महत्त्वाचा आहे. म्हणून सध्या मी अभ्यासावर करतो आहे. गणित हा माझा आवडता विषय आहे. मी सध्या खूप लहान आहे. त्यामुळे सध्या तरी मी अभ्यास करेन, असे सनीने सांगितले.