Join us

जाणून घ्या : आलियाचे रिलेशन स्टेट्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2016 17:05 IST

आलिया भट्ट हिचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे, यात आम्हाला तीळभरही शंका नाही. आजपर्यंत आलिया कधीही कुण्या दुसºया अभिनेत्रीला फॉलो ...

आलिया भट्ट हिचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे, यात आम्हाला तीळभरही शंका नाही. आजपर्यंत आलिया कधीही कुण्या दुसºया अभिनेत्रीला फॉलो करताना दिसली नाही. फार क्वचित प्रसंगी आलियाची फॅशन चॉईस चुकीची ठरली. काल रात्री आलिया ‘एम एस धोनी: दी अलटोल्ड स्टोरी’च्या स्क्रीनिंगला पोहोचली. खाकी रंगाचे जॅकेट, रिप्ड डेनिम आणि काळ्या रंगाचे टॉप अशा कॅज्युअल अवतारात ती दिसली. पण यावेळी आलियाच्या स्नीकर्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. या स्नीकर्सवर लिहिलेले होते ‘On and Off ’.  अर्थात आलियाचे हे स्नीकर्स पाहिल्यानंतर आमच्या डोक्यात आणखीही एक बाब आली. ती म्हणजे, आलियाचे रिलेशनशिप स्टेटस. होय, आम्ही बोलतोय ते आलिया व सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याविषयी. सिद्धार्थसोबतचे रिलेशन आलियाने अद्यापही जाहिरपणे कबुल केलेले नाही. पण ते लपूनही राहिलेले नाही. याचदरम्यान दोघांमध्ये ब्रेकअपच्या बातम्याही आल्या. मग पुन्हा दोघांमध्ये आॅल वेल असल्याचेही कळले. पण अगदी अलीकडे दोघांनीही पुन्हा ब्रेक घेतला असल्याचे समजते. कदाचित ‘On and Off’मधून आलिया हेच सांगू इच्छित असावी?