Join us

LEAK : ​सलमान खान व कॅटरिना कैफचा इंटिमेट फोटो होतोय वेगाने व्हायरल ! बघितला नसेल तर इथे बघा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 15:55 IST

सलमान खानच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घ्यायला कुणाला आवडणार नाही. कालच आम्ही तुम्हाला सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या वाढत्या जवळीकीबद्दल ...

सलमान खानच्या लव्ह लाईफबद्दल जाणून घ्यायला कुणाला आवडणार नाही. कालच आम्ही तुम्हाला सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या वाढत्या जवळीकीबद्दल सांगितले होते. सलमान व कॅट दोघेही आपल्या जुन्या नात्याला दुसरी संधी देण्याच्या तयारीत तर नाहीत ना? असे आम्ही म्हटले होते. अर्थात आमच्या म्हणण्याला आधार होता. सलमान व कॅटची जवळीक सध्या भलतीच वाढली आहे. मग ते आयफा अवार्ड्सचे स्टेज असो वा ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाचा सेट. आता तर या दोघांचा एक इंटिमेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा फोटो सलमानच नव्हे तर कॅटरिनाच्या चाहत्यांच्या मनातही आशेचा किरण निर्माण करणारा आहे. कारण हा फोटो कॅट व सलमान यांच्यातील कधीकाळी निर्माण झालेला दुरावा मिटवणारा आहे. या कपलच्या एका चाहत्याने हा फोटो अपलोड केला आहे. यात कॅट सलमानच्या मिठीत विसावलेली आहे. आता हा फोटो फेक आहे वा रिअल, याबद्दल आम्ही काहीही सांगणार नाही. पण या फोटोत दोघेही अतिशय सुंदर दिसत आहे, हे मात्र आम्ही दाव्यानिशी सांगू शकतो.​ALSO READ : सलमान खान व कॅटरिना कैफ आपल्या जुन्या रिलेशनशिपला देणार का दुसरी संधी?काही दिवसांपूर्वी आयफा अवार्ड्सच्या स्टेजवर कॅट आणि सलमानची केमिस्ट्री चांगलीच रंगली होती. आयफाच्या स्टेजवर गाणे गात सलमानने कॅटला बर्थ डे विश केले होते. सध्या कॅट व सलमान ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात बिझी आहे.काही वर्षांपूर्वी सलमान व कॅट रिलेशनशिपमध्ये होते. पण नंतर त्यांचे ब्रेकअप झाले. या ब्रेकअपनंतर कॅटरिना रणबीर कपूरच्या प्रेमात पडली. पण रणबीर कपूरसोबतचे तिचे नातेही टिकू शकली नाही. सध्या कॅट सिंगल आहे आणि निश्चितपणे तिला कुणाची तरी गरज आहे. अशात सलमान काय वाईट आहे?