Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदाच्या 'आ गया हिरो'चे ट्रेलर लाँच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 18:05 IST

अनेक वर्षांनंतर गोविंदा बॉलिवूडमध्ये कॅमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. 'आ गया हिरो' या चित्रपटाच्या माध्यमातून गोविंदा इंटस्ट्रीत पुन्हा पदार्पण ...

अनेक वर्षांनंतर गोविंदा बॉलिवूडमध्ये कॅमबॅक करण्यास सज्ज झाला आहे. 'आ गया हिरो' या चित्रपटाच्या माध्यमातून गोविंदा इंटस्ट्रीत पुन्हा पदार्पण करतोय. नुकताच मुंबईत या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच करण्यात आला. या ट्रेलर लाँचला मनिष कोईराला आणि शिल्पा शेट्टी उपस्थित होता. आपल्या सेंकड इनिंगला घेऊन गोविंदा खूपच उत्साहित दिसला. तसाच थोडा नर्व्हस ही दिसला. गोविंदाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्याची पत्नी सुनिता मुलगी टिना आणि मुलगा हर्षवर्धन अहुजाही आला होता. या ट्रेलरमध्ये चार्म, अॅक्शन आणि गोविंदा स्पेशल डान्स स्टेप दिसल्या. या चित्रपटात मी एका पोलीस ऑफिसरची भूमिका केली आहे. ट्रेलर लाँचिंगच्या वेळी त्यांने पत्रकारांशी ही संवाद साधला. यावेळी तो म्हणाला आता पर्यंत दुसऱ्यांसाठी काम करताना मी खूप डिमांड करायचो आता स्वता: जेव्हा मी  निर्माता बनलो तर लोक माझ्याकडून डिमांड करायला लागले. त्यामुळे मी खूप विन्रम झालो आहे. या चित्रपटात गोविंदा आपल्याला अॅक्शन करताना दिसणार आहे. विशेष गोष्ट ही आहे यातले खूप अॅक्शन सीन गोविंदाने स्वता: केले आहेत. याबाबत प्रश्न विचारला तेव्हा गोविंदा म्हणाला जेव्हा एखाद्या चित्रपटात तुमचा पैस लागतो तेव्हा मोठे मोठे स्टंट ही हिरो करायला तयार होतात.गोविंदाच्या वाढदिवसाला या चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला होता. या चित्रपटात गोविंदासह मकरंद देशपांडे आणि आशुतोष राणा ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गोविंदा बिग बॉसच्या मंचावर आला होता. अनेक वर्षांनी गोविंदा कॅमबॅक करत असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये खूप उत्सुकता आहे.