Latest pics : करिना कपूरच्या लाडक्या तैमूरची पुन्हा बघावयास मिळाली झलक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2017 16:26 IST
करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमूर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला स्टारकिड आहे. कारण दर दिवसाआड तैमूरचे ...
Latest pics : करिना कपूरच्या लाडक्या तैमूरची पुन्हा बघावयास मिळाली झलक!
करिना कपूर आणि सैफ अली खान यांचा लाडका तैमूर सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला स्टारकिड आहे. कारण दर दिवसाआड तैमूरचे फोटोज् समोर येत असून, ते बघून प्रत्येकजण त्याच्या प्रेमात पडत आहे. आता पुन्हा एकदा तैमूरचे लेटेस्ट फोटोज् समोर आले असून, त्यामध्ये त्याचा लुक बघण्यासारखा आहे. अतिशय गोंडस दिसत असलेला तैमूर आजी बबिता यांच्या घरून परतत आहे. वास्तविक तैमूर नेहमीच आजीकडे जात असून, आजी बबितालाही त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालावयास आवडते. तैमूरच्या या फोटोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे फोटो बघून लगेचच लक्षात येईल की, तो आता मोठा होत आहे. शिवाय दिवसागणिक त्याचे रूपही खुलत आहे. फोटोमध्ये तैमूर पांढºया रंगाचे टी शर्ट आणि निळ्या रंगाचे ट्राउझर्स घातलेल्या लुकमध्ये दिसत आहे. या ड्रेसवर त्याने घातलेले पांढºया रंगाचे शूज त्याला शोभून दिसत आहेत. जेव्हा छायाचित्रकारांनी तैमूरचे फोटो काढण्यासाठी त्याच्याकडे कॅमेरे वळविले तेव्हा त्यांना स्माइल देत त्यांने पोज दिली. तैमूरचे दिवसाआड फोटो समोर येत असल्याने तो प्रेक्षकांचा लाडका बनला आहे. तैमूरचे पप्पा सैफ अली खान याने नुकतेच एका मुलाखतीत म्हटले होते की, तैमूरच्या दिवसाची सुरुवात खूपच आनंदी होते. तैमूर सकाळी उठून भजन ऐकतो. त्यामुळे त्याला खूप आनंद मिळतो. त्याचबरोबर त्याला नर्सरीच्या कविता ऐकायलाही खूप आवडते. थोडक्यात तैमूरला संगीत खूप आवडत असल्याचे त्याच्या या सवयींवरून दिसून येते.