Join us

Lata Mangeshkar Health Update: लता मंगेशकर यांची प्रकृती चिंताजनक, पुन्हा ठेवलं व्हेंटिलेटरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 14:42 IST

Lata Mangeshkar Health Update: ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालवली आहे.

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांची प्रकृती पुन्हा खालवली आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. दीदींना ८ जानेवारी रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात खल करण्यात आले होते. गेले 27 दिवस त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्या लवकरात लवकर बरं वाटवे यासाठी देशभरातून प्रार्थना केल्या जातायेत.  

लता मंगेशकर यांच्यावर उपचार करणारे डॉ. प्रतित समदानी आणि त्यांची टीम दीदींच्या प्रकृतीची सतत काळजी घेत आहे. पुन्हा एकदा लतादीदींची तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर हलवले आहे. त्यांच्यावर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक २४ तास रुग्णालयात हजर असते.

 

6-7 दिवसांपूर्वी व्हेंटिलेटर सपोर्टवरून काढले होते गेल्या ६-७ दिवसांपूर्वी डॉक्टरांनी लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने व्हेंटिलेटर काढले होते. तेव्हा डॉक्टर प्रतित समदानी  यांनी सांगितले होते की, त्यांची प्रकृतीत सुधारणा आहे, त्यामुळे त्यांचं व्हेंटिलेटर काढून टाकण्यात आले आहे, परंतु त्या आयसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत.

टॅग्स :लता मंगेशकर