अनुष्का करतेय ‘सुल्तान’ ची शेवटची शूटींग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2016 12:47 IST
अनुष्का शर्मा सध्या फार खुश आहे. ‘सुल्तान’ चित्रपटाचे शूटींग अंतिम टप्प्यात असून एका रोमँटिक गाण्याच्या शूटींगसाठी आता ते दोघे ...
अनुष्का करतेय ‘सुल्तान’ ची शेवटची शूटींग !
अनुष्का शर्मा सध्या फार खुश आहे. ‘सुल्तान’ चित्रपटाचे शूटींग अंतिम टप्प्यात असून एका रोमँटिक गाण्याच्या शूटींगसाठी आता ते दोघे बुडापेस्टमध्ये आहेत. इन्स्टाग्रामवर तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.तिने या फोटोंना कॅप्शन दिले की,‘टचडाऊन इन बुडापेस्ट. होम फॉर नेक्स्ट फ्यू डेज शूटींग साँग फॉर सुल्तान!’ छानशा लोकल्समध्ये शूटींग करणे हेच खरे शूटींगचे सौंदर्य असते. तिने तिचा मेकअप करतांनाचाही फोटो पोस्ट केला.त्याला कॅप्शन दिले की,‘ फिनिशिंग टचेस! लास्ट डे शूट फॉर सुल्तान बुडापेस्ट.’ वेल, अनुष्का तू तर ‘सुल्तान’ च्या बाबतीत फारच उत्साहीत आहेस. चित्रपट केव्हा रिलीज होतो अशी रसिक वाट पाहत आहेत.