Bollywood Actress Lara Dutta: हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून येण्याचा राजमार्ग सौंदर्य स्पर्धातून येतो. मात्र या सौंदर्य स्पर्धातून विजेत्या ठरलेल्या सर्वच सुंदरी अभिनेत्री म्हणून आपलं आव्हान टिकवून ठेवू शकत नाही. पण जिने सौंदर्य स्पर्धा जिंकल्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं अशी अभिनेत्री म्हणजे लारा दत्ता. 'अंदाज', 'पार्टनर', 'भागम भाग', 'सिंग इज ब्लिंग' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री लारा दत्ता हिने २००० साली मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावला होता.डोक्यावर मिस युनिव्हर्सचा मुकुट सजवत तिने जागतिक स्तरावर देशाचं नाव उंचावलं.
लारा दत्ताचा जन्म हा १६ एप्रिल १९७८ रोजी गाझियाबादमध्ये झाला. तिचे वडील हवाई दलात कार्यरत होते. साल २००० मध्ये तिने मिस इंडियाचा खिताब जिंकल्यानंतर लारा रातोरात प्रसिद्ध झाली. तिच्या या विजेतेपदाची कथा देखील खूप रंजक आहे.दरम्यान, लाराने अखेर मिस युनिव्हर्स स्पर्धा कशी जिंकली? तिला स्पर्धेच्या शेवटी परीक्षकांनी कोणता प्रश्न विचारला होता आणि तिने नेमकं काय उत्तर दिलं? जाणून घेऊया...
काय होता तो प्रश्न?
मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांना अनेक टप्प्यांतू पार पडते. तिचे स्पर्धकांच्या सौंदर्याबरोबरच, त्यांच्या अनेक कलागुणांचीही परीक्षा घेतली जाते. २००० साली मिस युनिव्हर्स स्पर्धेदरम्यान तेव्हा सायप्रसमध्ये आंदोलन सुरु होतं. त्यावेळी मिस युनिव्हर्स कार्यक्रम महिलांचा अनादर करणारा असल्याचा आरोप आंदोलकांक़डून करण्यात आला होता. मात्र, स्पर्धा ही सुरुच होती. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताकडून लारा दत्ता, व्हेनेझुएलाची क्लॉडिया मोरेनो आणि स्पेनची हेलन लिंडेस या तीन स्पर्धक पोहोचल्या होत्या.
त्यादरम्यान, फायनल राउंडमध्ये लारा दत्ताला विचारण्यात आलं, "मिस युनिव्हर्स स्पर्धेच्या विरोधात बाहेर निदर्शने होत आहेत. लोकांचं म्हणणे आहे की ही स्पर्धा महिलांचा अपमान करणारी आहे. तुम्ही या आंदोलकांना ते चुकीचे आहेत हे कसे पटवून द्याल? त्यावर लाराने अगदी सुंदर पद्धतीने उत्तर दिलं,मला वाटते की मिस युनिव्हर्ससारख्या सौंदर्य स्पर्धा आम्हा तरुण मुलींना एक चांगलं व्यासपीठ देतात. मग ते व्यवसाय,सशस्त्र दल असो किंवा राजकारण असो. हे व्यासपीठ त्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतं." लारा दत्ताचं हे उत्तर तेथील परिक्षकांना खूप आवडलं आणि लारा मिस युनिव्हर्स स्पर्धेची विजेती झाली.
Web Summary : Lara Dutta won Miss Universe 2000, impressing judges with her answer about the competition empowering women. She argued it provides a platform for young women in various fields, driving her to victory and a Bollywood career.
Web Summary : लारा दत्ता ने 2000 में मिस यूनिवर्स का खिताब जीता, उनके जवाब ने जजों को प्रभावित किया कि यह प्रतियोगिता महिलाओं को सशक्त बनाती है। उन्होंने तर्क दिया कि यह युवा महिलाओं को विभिन्न क्षेत्रों में एक मंच प्रदान करता है, जिससे उन्हें जीत मिली और बॉलीवुड करियर शुरू हुआ।