Join us

विवाहित असलेल्या महेश भूपतीच्या प्रेमात पडली होती लारा दत्ता, अशी फुलली दोघांची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 08:00 IST

करिअरच्या सुरुवातीच्या काळात लाराचं नाव अनेकांसोबत जोडले गेले.

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता आज आपला ४४वा वाढदिवस साजरा करत आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये लाराचा जन्म झाला होता. 2000 साली मिस यूनिव्हर्सचा किताब मिळवणाऱ्या लाराचे वडील पंजाबी आहेत. आता भलेही ती जास्त सिनेमांमध्ये दिसत नसली तरी ती नेहमीच चर्चेत असते.

करिअरच्या सुरुवातीच्या काळात लाराचं नाव अनेकांसोबत जोडले गेले. केली दोरजी पासून ते दीनो मोरियापर्यंत आणि टायगर वुड्स ते महेश भूपतीपर्यंत लाराचं नाव जोडलं गेलं. लाराचं लव्ह लाईफ नेहमीच वादात राहिलं. लारा ही सुरुवातीला मॉडेल आणि अभिनेता केली दोरजीला डेट करत होती. नंतर मिस युनिव्हर्स झाल्यावर लाराने जाहीरपणे आपलं रिलेशनशीप स्वीकारले.

दोघेही लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार, लारा मॉडल दीनो मारियाला डेट करत होती. लाराच्या आयुष्यात महेश आला तेव्हा तो विवाहीत होता. महेशने भूपतीने 2002 मध्ये मॉडल श्वेता जयशंकरसोबत लग्न केलं होतं. पण हे लग्न केवळ 7 वर्ष टिकलं आणि दोघांनी घटस्फोट घेतला. 

लारा दत्ता आणि  महेश भूपती  या दोघांची भेट महेशच्या एन्टटेन्मेंट आणि स्पोर्ट मॅनेजमेंट कंपनीच्या एका बिझनेस मिटींग दरम्यान झाली होती. लारा दत्ताने तिच्या कंपनीच्या मॅनेजमेंटचं काम महेशच्या कंपनीला दिलं होतं. या भेटीनंतर लारा आणि महेश डेटिंग करु लागले.

यादरम्यान महेश भूपती माजी मिस यूनिव्हर्स लारा दत्ताच्या प्रेमात पडला. पण दोघांनी अनेकवर्ष आपलं नातं लपवून ठेवलं होतं. पुढे 16 फेब्रुवारी 2011 मध्ये भूपतीने मुंबईत लारासोबत लग्न केलं. आता त्यांना एक मुलगी असून त्यांनी तिचं नाव सायरा ठेवलं आहे.

टॅग्स :लारा दत्ता