Join us
Daily Top 2Weekly Top 5

​लाराने मॉरिशसमध्ये साजरा केला वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 19:16 IST

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिने शनिवारी ३९ वा वाढदिवस साजरा केला. तोही मॉरिशसमध्ये. यावेळी लारा एका रिसॉर्ट बीचवर कुटुंबासोबत ...

बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिने शनिवारी ३९ वा वाढदिवस साजरा केला. तोही मॉरिशसमध्ये. यावेळी लारा एका रिसॉर्ट बीचवर कुटुंबासोबत धम्माल मस्ती करताना दिसली.   लाराची क्यूट बेबी, हँडसम हबी आणि दोन बहिणी शिवाय त्यांची मुले अशा सगळ्यांनी मिळून लाराचा वाढदिवस साजरा केला. लवकरच लारा ‘अजहर’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरूद्दीन याच्या आयुष्यावर बेतलेला आहे. यात लारा वकीलाच्या भूमिकेत आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.