Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘लंगुर के हाथ में अंगुर' म्हणत तरुणाला हिणवले गेले, पण तो आहे तरी कोण जाणून घेतल्यानंतर भल्याभल्यांची झाली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 16:12 IST

राजा राणी” या सिनेमापासून दिग्दर्शनाची सुरुवात केली होती.त्याचा पहिलाच सिनेमा सुपर डुपर हिट ठरला.

रेशीमगाठी स्वर्गातच जुळतात असं म्हटलं जातं. लग्नबंधनात अडकलेले दाम्पत्य हाच जन्म नाही तर सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतात.अनेकजण आपल्या आवडत्या तर कोणी आपल्या आ वडिलांच्या पसंतीने जीवनसाथी निवडतात. काही तर इतक्या हटके कपल असतात की त्यांची चर्चाही वर्ष वर्ष रंगते. नेहमीच त्या रसिकांचे आकर्षण ठरत असतात.

मध्यंतरी असे एक कपल चर्चेत आले होते. सोशल मीडियावर या कपलचे फोटो खूप व्हायरल झाले. या फोटोंमध्ये ब्लॅक आणि व्हाइट कमेंट करत तर कोणी ‘लंगुर के हाथ में अंगुर' अशा कमेंटस करत लोकांनी त्यांची खिल्लीही उडवली होती. मुलाच्या सावळ्या रंगामुळे त्याला हिणवले गेले. प्रेम हे चेहरा बघून नाहीतर मन बघून केले जाते याचा विसरच जणु सा-यांना पडला होता. लोकांच्या चित्र विचित्र कमेंटमुळे हेच लोकांनी सिद्ध केले होते. तर दुसरीकडे हे दोघे कोण आहेत तरी कोण? हा मुलगा कोण आहे हे जाणून घेण्याचीही नेटीझन्सची उत्सुकता वाढत होती. या मुलाचे नाव अँटली कुमार आहे व मुलीचे नाव कृष्णप्रिया आहे.

अँटली कुमार हा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत लोकप्रिय दिग्दर्शक आहे. त्याने आज पर्यंत तामिळ भाषेतील अनेक हिट सिनेमे दिले आहेत. अँटलीने 2013 मध्ये “राजा राणी” या सिनेमापासून  दिग्दर्शनाची सुरुवात केली होती.त्याचा पहिलाच सिनेमा सुपर डुपर हिट ठरला. याच सिनेमातून तो ख-या अर्थाने प्रकाशझोतात आला. विशेष म्हणजे त्याने दिग्दर्शित केलेल्या या तामिळ सिनेमाने तब्बल 84 करोड रुपयांची बॉक्स ऑफिसवर कमाई केली होती. नंतर देखील अँटलीने अनेक हिट सिनेमाचे दिग्दर्शन केले. मात्र याविषयी फारसी माहिती लोकांना नाही.

तर कृष्णप्रिया ही देखील लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. खरंतर अँटलीच्या चेह-यापेक्षा त्याची कामाप्रती असणारी प्रतिष्ठा आणि त्याचे साफ मन पाहून   कृष्णप्रिया त्याच्या प्रेमात पडली. जवळपास 8 वर्ष एकमेकांना डेट करत होते. दोघांनी 2014 मध्ये लग्न केले. दिसायला अत्यंत साधारण दिसणारा अँटलीची कामगिरी कोणी नाही पाहिली वर्णभेद करून त्याची थट्टा केली गेली.