Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कृप सूरी रूग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 20:30 IST

‘कलश’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा कृप सूरी रूग्णालयात भरती आहे. सेटवरच आजारी पडल्याने कृपला तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. ...

‘कलश’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा कृप सूरी रूग्णालयात भरती आहे. सेटवरच आजारी पडल्याने कृपला तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले. थकवणारे शूटींग शेड्यूल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे कृपला लिवर इन्फेक्शन झालेय. कृपने याबाबत माहिती दिली. मला  आणखी काही दिवस रूग्णालयात राहावे लागणार आहे. सततच्या शूटींग शेड्यूलमुळे माझ्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. योग्य खाणे-पिणे नाही आणि त्यातच पुरेशी झोप नाही, याचाच हा परिणाम आहे, असे कृप म्हणाला. सध्यातरी कृपला डॉक्टरांनी काहीदिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय. तेव्हा कृप विश्रांती घे आणि लवकर बरा हो!!