विद्या, आदित्य यांच्यावर कुणालचा चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2016 16:35 IST
कुणाल रॉय कपूर आता दिग्दर्शन क्षेत्रात उतरला असून, आपली भावजय विद्या बालन आणि भाऊ आदित्य रॉय कपूर यांना एकत्र ...
विद्या, आदित्य यांच्यावर कुणालचा चित्रपट
कुणाल रॉय कपूर आता दिग्दर्शन क्षेत्रात उतरला असून, आपली भावजय विद्या बालन आणि भाऊ आदित्य रॉय कपूर यांना एकत्र घेऊन चित्रपट काढण्याचा त्याचा मानस आहे. विद्या आणि आदित्य यांना घेऊन चित्रपट काढणार का? या प्रश्नावर त्याने सांगितले की, माझ्याकडे एक कथा आहे, जी त्यांच्यासाठी योग्य आहे. मी या कथेवर काम करीत आहे. कदाचित मी या चित्रपटाचे दिग्दर्शन करीन. भविष्यात मी या दोघांसाठी चित्रपट काढीन. त्यांना घेऊन चित्रपट काढणे मला आवडेल. तरीही या वेळेस माझ्या चित्रपटाबाबत मी काही सांगू शकत नसल्याचे कुणाल म्हणाला.कुणाल ‘अझहर’ या चित्रपटात दिसला होता. आपल्या कौटुंबिक सदस्याबरोबर काम करण्यासंदर्भात आपण सांगू शकत नसल्याचे तो म्हणाला. कुटुंबासमवेत काम करणे वेगळे असते. त्यामुळे काम कसे असेल याबाबत सांगता येत नाही, असे कुणालने शेवटी सांगितले.