कुंभमेळा मधून व्हायरल झालेली मोनालिसा पुन्हा चर्चेत आली आहे. कुटुंबियांचा विरोध झुगारुन तिने बॉयफ्रेंड फरमान खानशी लग्न केलं. केरळला पळून जात तिने फरमानशी लग्नगाठ बांधली. मोनालिसाला सिनेमात ब्रेक देणारे दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी या प्रकरणाला लव्ह जिहादचा अँगल दिला. तसंच मोनालिसा अल्पवयीन आहे अशीही एक चर्चा झाली. आता या सगळ्या चर्चांवर मोनालिसा भोसले आणि तिचा पती फरमान खानने पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे.
मोनालिसा भोसले आणि पती फरमान खान यांनी लग्नानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी मोनालिसाने स्पष्ट केले की, "आमचं लग्न हिंदू पद्धतीने झालं आहे. खरं तर त्याला माझ्याशी लग्नच करायचं नव्हतं. पण मीच जबरदस्ती याच्याशी लग्न केलं. माझे वडील माझं लग्न कोणा दुसऱ्याशीच लावून देणार होते. पण मला तो मुलगा पसंत नव्हता. तो माझ्या आत्याचाच मुलगा होता. आत्याचा मुलगा म्हणजे माझा भाऊ झाला ना...म्हणून मी त्याच्याशी लग्नाला नकार दिला. माझे वडील माझ्यासोबतच आले होते. ते अजूनही इथेच आहेत पण ते लग्नाला आले नाहीत. मी लग्न केलंय हे त्यांना माहित आहे. ते सध्या जरा नाराज आहेत. काल ते आम्हाला भेटले होते. मी हिंदू रिती रिवाजाप्रमाणे लग्न केलं आहे. सगळे जे लव्ह जिहाद बोलत आहे तसं काहीच नाहीये. आम्ही कलाकार आहोत आमच्यासाठी सर्व धर्म एकच आहे. मी सगळ्या धर्माला एक मानते."
यानंतर फरमान खान म्हणाला, "आजही ती हिंदू धर्मातच आहे आणि मी मुस्लिम धर्मातच आहे. आम्हा दोघांपैकी कोणीही धर्म बदललेला नाही, धर्म परिवर्तन केलेलं नाही. मी सुद्धा अभिनेताच आहे. छोट्या भूमिका करतो. जोशुआ सरांचा एक मल्याळम सिनेमा येतोय त्यात मी आहे. मी मोनालिसाशी हिंदू रितींप्रमाणेच लग्न केलं आहे. मोनालिसा हिंदू आहे. मला मोनालिसाला खूश ठेवायचं आहे. तिच्या आनंदासाठीच मी हे केलं कारण माझं तिच्यावर प्रेम आहे. त्यामुळे प्रेमात धर्म परिवर्तन करणं गरजेचंच आहे असं अजिबात नाही. सर्व धर्मसमभाव आहे. मी उत्तर प्रदेशचा आहे. मोनालिसाचं वय विचाराल तर हे तिचं बर्थ सर्टिफिकेट आहे ज्यावर १ जानेवारी २००८ लिहिलं आहे. त्यामुळे ती अल्पवयीन नाही. तिचं वय १८ पूर्ण आहे. आता आम्ही स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत रजिस्टर पद्धतीनेही लग्न करणार आहोत."
Web Summary : Monalisa Bhosale and Farman Khan address 'love jihad' claims. They clarified their interfaith marriage occurred with Hindu rituals and neither converted. Monalisa emphasized respect for all religions, while Farman confirmed her age and intention to register the marriage.
Web Summary : मोनालिसा भोसले और फरमान खान ने 'लव जिहाद' के दावों को संबोधित किया। उन्होंने स्पष्ट किया कि उनका अंतरधार्मिक विवाह हिंदू रीति-रिवाजों से हुआ और किसी ने भी धर्म परिवर्तन नहीं किया। मोनालिसा ने सभी धर्मों के प्रति सम्मान पर जोर दिया, जबकि फरमान ने उनकी उम्र और शादी को पंजीकृत करने के इरादे की पुष्टि की।