Join us

"तो माझ्या नणंदेसोबत रात्रभर..."; कुमार सानूच्या EX पत्नीचा गायकावर गंभीर आरोप, केली मोठी पोलखोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 15:28 IST

कुमार सानूची एक्स पत्नी रीटाने गायकावर गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय सासरच्या मंडळींबद्दल धक्कादायक विधानं केली आहेत, जे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटेल

उत्कृष्ट गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेले गायक म्हणजे कुमार सानू. गायक कुमार सानू यांच्या आयुष्यातील जुन्या प्रकरणांबद्दल त्यांची EX पत्नीने सर्वांना सांगितलंय. रीटा भट्टाचार्य यांनी एका मुलाखतीमध्ये कुमार सानू आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल काही गंभीर आणि धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यामुळे कुमार सानूच्या चाहत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. काय म्हणाली कुमार सानूची ex बायको? जाणून घ्या.

कुमार सानू आणि त्याच्या बहिणीबद्दल काय म्हणाली रीटा

रीटा भट्टाचार्य फिल्म विंडोला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, ''कुमार सानूच्या वडिलांनी म्हातारपणी लग्न केलं होतं. त्यांचे वडील त्यांच्या आईसमोर रोज तयार होऊन नवीन बायकोला भेटायला जात असत. त्यांच्या घराची हीच पद्धत होती. कुमार सानूला पाच भावंडं होती. त्यांची एक विवाहित बहीण ४५ वर्षांची असून तिला तीन मुलं आहेत. बहिणीच्या मुलाचं लग्न मी लावून दिलं होतं, तिला नातूही झाला.''

''पण, तिन्ही मुलांना सोडून ती बहीण तिच्या प्रियकराला घेऊन माझ्या घरी आली होती. मी कुमार सानू यांना सांगितले होते की, तिचं आयुष्य बरबाद करू नको, पण ते आनंदी होते, कारण त्यांनाही तेच करायचं होतं. माझी नणंद कुमार सानू यांच्यासोबत रात्रभर एका खोलीत असायची. दोघं त्याच खोलीत एकत्र झोपायचे, रात्रभर गप्पा मारायचे तिथेच जेवायचे. कुमार सानूच्या कुटुंबातील सदस्यांची बाहेर प्रेमप्रकरणं होती.'' रीटा यांनी केलेल्या या सर्व आरोपांमुळे कुमार सानू यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. रीटा यांनी केलेल्या खुलाश्यांवर कुमार सानू काय उत्तर देतात, हे सर्वांना पाहायचं आहे.

टॅग्स :कुमार सानूबॉलिवूड