'धुरंधर' सिनेमाची क्रेझ ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या सिनेमातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. रणवीर सिंगच्या सिनेमातील 'शरारत' या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. हे गाणं अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या गाण्यातील क्रिस्टल डिसुजा आणि आयेशा खान यांच्या अदांनी चाहत्यांना वेडं करून सोडलं. पण, 'धुरंधर'मधील 'शरारत' गाण्यासाठी तमन्ना भाटियाला पहिली पसंती होती. मात्र दिग्दर्शक आदित्य धरने तमन्नाला न घेता क्रिस्टल आणि आयेशा यांची निवड केली. याबाबत आता क्रिस्टल डिसुजाने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
फ्रीप्रेस जर्नलला दिलेल्या मुलाखतीत क्रिस्टल डिसुजा म्हणाली, "खरं सांगायचं झालं तर मला वाटतं तमन्नानेही हे गाणं चांगल्या प्रकारे केलं असतं. पण कधी कधी जे लिहिलेलं असतं तेच घडतं. आपण त्या कोणत्याही गोष्टी बदलू शकत नाही. तिला हे गाणं करण्याची संधी मिळाली नाही. पण, जर मिळाली असती तर मला खात्री आहे की तिने तिच्या परिने ते उत्तम प्रकारेच केलं असतं. जर आयशानेही एकटीने हे गाणं केलं असतं. तर तिनेदेखील हेच केलं असतं. आणि जर या गाण्यात मी एकटी असते तर मीदेखील ते चांगल्याप्रकारे करण्याचाच प्रयत्न केला असता. प्रत्येक जण आपलं बेस्ट देण्याचाच प्रयत्न करतो".
"मी कधीही हार्ड वर्किंग, नेहमी प्रयत्न करणाऱ्यासाठी तयार असणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीला कमी लेखणार नाही. मला वाटतं की तमन्ना मोठे प्रोजेक्ट करत आहे आणि ती यापेक्षाही मोठ्या प्रोजेक्टवर काम करेल. प्रत्येकासाठी एक वेळ यावी लागते. सगळ्यांना रणवीर सिंग सारखं मोठं व्हायचं आहे. पण, कोणाला तरी मोठं करण्यासाठी कुठल्या दुसऱ्या व्यक्तीचे पाय खेचू नका", असंही क्रिस्टल डिसुजा म्हणाली.
Web Summary : Krystle D'Souza discussed replacing Tamannaah in 'Shararat', acknowledging Tamannaah would have done well. She emphasized everyone has their time and to support each other's growth.
Web Summary : क्रिस्टल डिसूजा ने 'शरारत' में तमन्ना को रिप्लेस करने पर कहा कि तमन्ना भी अच्छा करतीं। उन्होंने कहा सबका समय आता है, एक दूसरे के विकास में साथ दें।