Krystle Dsouza : आदित्य धरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला 'धुरंधर' चित्रपट यावर्षीच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे. सध्या सिनेरसिकांमध्ये या चित्रपटाबद्दल जोरदार चर्चा होत आहे.प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. रणवीर सिंग स्टारर हा स्पाय अॅक्शन थ्रिलर सिनेमाची जितकी चर्चा होतेय तितकीच या सिनेमातील गाण्यांचीही चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळतेय. या सिनेमातील शरारत या गाण्याने प्रेक्षकांना अक्षरश भुरळ घातली आहे.दरम्यान, शरारत गाण्यामध्ये अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा आणि आयेशा खान यांच्या डान्स नंबरने सगळ्यांचं लक्ष वेधल आहे. मात्र,काही दिवसांपासून या गाण्यामध्ये अभिनेत्री तमन्ना भाटियाची वर्णी लागणार होती, अशी माहिती समोर आली. आता यावर अभिनेत्री क्रिस्टल डिसूडजाने प्रतिक्रिया दिली आहे.
'धुरंधर' मधील शरारत या गाण्यावर लाखो लोक डान्स करत रिल्स व्हिडीओ बनवत आहेत. या गाण्यात आयशा खान आणि क्रिस्टल डिसूजा यांनी त्यांचा जलवा दाखवला आहे. पण, 'शरारत' गाण्यासाठी पहिली पसंती ही साऊथ स्टार तमन्ना भाटियाला होती.त्यात आता तमन्ना भाटियाच्या रिप्लेसमेन्टवर क्रिस्टलने भाष्य केलं आहे. अलिकडेच क्रिस्टल डिसूडजाने आयएएनएसला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्रीने बऱ्याच मुद्द्यावर तिचं मत मांडलं. जेव्हा तिला मुलाखतीत नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी केलेल्या विधानाबद्दल विचारण्यात आलं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की या गाण्यासाठी तमन्ना भाटियाचं नाव त्यांनी सुचवलं होतं, तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देत क्रिस्टल म्हणाली,"जे व्हायचं असतं ते होतंच. तमन्ना भाटियाच्या रिजेक्शनबद्दल मला काहीच माहिती नाही.कोणाच्या नशिबात जर काही लिहिलं असेल तर ते त्याला नक्कीच मिळते.मला वाटतं की हे माझ्या आणि आयशाच्याही नशिबात लिहिले होते, म्हणूनच आम्हाला ते मिळालं."
यानंतर मुलाखतीत अभिनेत्रीने म्हटलं, "तमन्ना एक उत्तम अभिनेत्री आहेच तसंच ती उत्कृष्ट नृत्यांगणा देखील आहे. शिवाय ती तितकीच सुंदर आहे. तिने नक्कीच या गाण्यातून प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली असती. तिची स्टाईल तिचं नृत्यकौशल फारच अप्रतिम आहे. अशा कलाकारांचा मला कायम अभिमान वाटतो." अशी स्पष्ट शब्दांत तिने प्रतिक्रिया दिली.
Web Summary : Krystle D'Souza replaced Tamannaah Bhatia in 'Dhurandhar's' 'Shararat' song. She acknowledged Bhatia's talent and believes the opportunity was destined for her and Ayesha Khan.
Web Summary : क्रिस्टल डिसूजा ने 'धुरंधर' के 'शरारत' गाने में तमन्ना भाटिया की जगह ली। उन्होंने भाटिया की प्रतिभा को सराहा और कहा कि यह मौका उनके और आयशा खान के लिए ही था।