Join us

क्रिती सनॉनची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह, चाहत्यांचे मानले आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 18:55 IST

काही दिवसांंपूर्वी क्रिती सनॉनला कोरोनाची लागण झाली होती.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनची अखेर कोरोनाची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ही माहिती क्रिती सनॉनने ट्विटरवर देत चाहते आणि डॉक्टरांचे आभार मानले आहेत. तिने ट्विट केले की, मला सांगायचा आनंद होतो आहे की माझी कोव्हिड १९ टेस्ट शेवटी निगेटिव्ह आली आहे. बीएमसीचे अधिकारी, माननीय असिस्टंट कमिशनर मिस्टर विश्वास मोटे आणि डॉक्टर्सचे आभार मानते की त्यांनी माझी मदत केली आणि माझी काळजी घेतली. तसेच तुमच्या सगळ्यांचे आभार तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली आणि प्रेम दिले.

क्रिती सनॉनला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. क्रिती राजकुमार रावसोबत चंदीगढला एका चित्रपटाचे शूटिंग करत होती. तिला कोरोनाची लागण झाल्यानंतर ती मुंबईत परतली आणि स्वतःला क्वारंटाइन केले होते.

क्रिती सनॉनने कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त इंस्टाग्रामवर कन्फर्म केले होते. तिने सांगितले होते की, मी बरी आहे आणि बीएमसीच्या गाइडलाइन्सनुसार क्वारंटाइन होते आहे. क्रितीच्या चाहत्यांनी तिला लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत होते. त्यामुळे क्रिती सनॉनने चाहत्यांचे आभार मानले होते. 

क्रिती सनॉनच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच मिमी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर करत आहे. या चित्रपटात तिच्यासोबत पंकज त्रिपाठी, मनोज पाहवा, सुप्रिया पाठक आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत आहेत.

मिमी चित्रपटात क्रिती सनॉन एका सरोगेट आईच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय क्रिती सनॉन अक्षय कुमारचा चित्रपट बच्चन पांडेमध्ये काम केले आहे. या चित्रपटाचे शूटिंग जानेवारी महिन्यात जैसलमेरमध्ये सुरू होणार आहे.

टॅग्स :क्रिती सनॉन