Join us

'भांगेत कुंकू आणि पाणावलेले डोळे...', क्रिती सनॉनच्या 'आदिपुरुष'मधील ऑडिओ पोस्टरला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2023 12:28 IST

Aadipurush : प्रभास आणि क्रिती सनॉन अभिनीत, ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे.

प्रभास(Prabhas) आणि क्रिती सनॉन (Kriti Sanon) अभिनीत, ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुष’ (Aadipurush) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर रामनवमीच्या मुहुर्तावर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी चित्रपटातील हनुमानाचा लूक समोर आला होता. आता ‘आदिपुरुष’मधील सीतामातेचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटात अभिनेत्री कृती सनॉन सीतेची भूमिका साकारत आहे. या चित्रपटातील तिचा पहिला लूक समोर आला आहे. या पोस्टरमध्ये क्रिती सीतामातेच्या वेशात दिसत आहे. भगव्या रंगाची साडी तिने नेसलेली दिसत आहे. तिचे डोळेही थोडे पाणावलेले दिसत आहेत.

क्रितीच्या सीतामातेच्या या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतले आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाल्यानंतर नेटकऱ्यांनी सीतामातेच्या भांगेत कुंकू नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. नुकत्याच प्रदर्शित केलेल्या या पोस्टरमध्ये ही चूक सुधारण्यात आली आहे. सीतामातेच्या भूमिकेत असलेल्या क्रितीच्या भांगेत कुंकू असल्याचे पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे.

बहुचर्चित आदिपुरुष चित्रपट १६ जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटात प्रभास श्रीरामांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत तर मराठी अभिनेता देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :क्रिती सनॉनआदिपुरूषप्रभास