Join us

घो मला असला हवा...! क्रिती सनॉनला हवाय असा राजकुमार, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 18:45 IST

नुकतेच क्रिती सनॉनने तिच्या स्वप्नातील राजकुमाराबद्दल सांगितले.

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या साखरपुड्याची बातमी आल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचाच्या लग्नाची चर्चा सध्या सुरू आहेत. त्यात आता बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनने तर तिला लाइफ पार्टनर कसा हवा आहे याबद्दल नुकताच हॅलो अॅपवर खुलासा केला आहे.

हॅलो अॅपवर क्रिती सनॉनचा आरजे एकताने बातचीत करताना तिला तुला लाइफ पार्टनर कसा हवा आहे, याबद्दल विचारले. त्यावर क्रितीने तिच्या लाइफ पार्टनरबद्दलच्या अपेक्षा सांगितल्या. ती म्हणाली की, त्याची पर्सनॅलिटी चांगली असायला पाहिजे. विश्वासू, प्रामाणिक, विनोदी व महत्त्वकांक्षी असला पाहिजे.

तिने पुढे सांगितले की, बऱ्याच लोकांच्या आयुष्यात काहीच हेतू नसतो. तर असे नसले पाहिजे. मला कामाप्रती प्रेम असणारा असा टॅलेंटेड व्यक्ती हवा आहे. क्रिती सनॉनला तिच्या स्वप्नातील राजकुमार कधी मिळेल हे पाहावे लागेल.

लॉकडाऊनमुळे सध्या सगळीकडेच शूटिंग थांबले आहे. परिणामी सर्व कलाकार आपल्या घरी कुटुंबीयांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉनसुद्धा सोशल मीडियावर बरीच सक्रिय झाली आहे. तिचे फोटो आणि व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच मिमी सिनेमात दिसणार आहे. यात ती एका सरोगेट मदरची भूमिका साकारणार आहे. महिलाप्रधान हा सिनेमा असून त्याची कथा महिलाच पुढे नेते. मराठीत आलेल्या 'मला आई व्हायचंय' या सिनेमावर आधारित हा सिनेमा असणार आहे. त्यामुळे सिनेमात काहीसा भावनिक अँगलही पाहायला मिळेल. या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक आणि सई ताम्हणकर दिसणार आहे. लक्ष्मण उत्तेकर या सिनेमाचे दिग्दर्शन करतायेत.

टॅग्स :क्रिती सनॉनसई ताम्हणकर