Join us

क्रिती सॅनन मालदीवमध्ये व्हॅकेशन करतेय एन्जॉय, SEE PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 19:30 IST

आगामी काळात 'लुका छुपी' मध्ये ती कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. आता 'पानीपत', 'हाउसफुल 4' आणि 'अर्जुन पटियाला'मध्ये ती दिसणार आहे.

क्रिती सॅनन सध्या मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिने काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती पुलशेजारी बिकीनमध्ये दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये क्रिती तिच्या हॉटेलच्या रुममध्ये दिसते आहे. क्रिती तिच्या बोल्ड अंदाजासाठी नेहमीच चर्चेत असते. ती तिच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तिचे अनेक फोटो शेअर करत असते.

तिने आपले इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्लोमोशन व्हिडीओ टाकला आहे. ज्यामध्ये ती स्वीमिंग पूलमध्ये दिसत आहे. कृति या व्हिडिओमध्ये खूप फ्रेश आणि प्रिटी दिसत आहे. आगामी काळात 'लुका छुपी' मध्ये ती कार्तिक आर्यनसोबत दिसली होती. आता 'पानीपत', 'हाउसफुल 4' आणि 'अर्जुन पटियाला'मध्ये ती दिसणार आहे. 

'पानीपत' सिनेमामुळे क्रिती खूप चर्चेत आहे. कारण  सदाशिवराव यांची दुसरी पत्नी पार्वतीबाईची भूमिकेत ती दिसणार आहे. पार्वतीबाई पानीपत संग्रामाच्यावेळी पतीसमवेत प्रत्यक्ष रणभूमीवर गेल्या होत्या. पार्वतीबाईंची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्री क्रिती सॅनन मेहनत घेत आहे. मात्र ही मराठी व्यक्तीरेखा साकारणं आव्हानात्मक असल्याचं क्रिती म्हणते.

 

ही भूमिका साकारणं म्हणजे आपल्यासाठी एक वेगळं जग आहे असं क्रितीला वाटतं. “मूळची उत्तर भारतीय असल्याने मराठी व्यक्तीरेखा साकारणं आव्हानात्मक होतं. मात्र आशुतोष गोवारीकर यांच्यामुळे ही भूमिका साकारणं सोपं गेलं तसंच हा एक सुखद अनुभव होता” असं क्रितीने म्हटले आहे. ६ डिसेंबर रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.

टॅग्स :क्रिती सनॉनपानिपत