Join us

कोट्यावधीच्या संपत्तीची मालकीण आहे क्रिती सॅनन, मुंबईत खरेदी केलाय ६० कोटींचा फ्लॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 12:39 IST

रसिकांची लाडकी आणि फेव्हरेट असलेल्या क्रितीच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही. रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली क्रिती कोट्यावधीची मालकीण आहे.आलिशान आयुष्य आज ती जगते.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅननने  अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. क्रिती दिल्लीत इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होती, पण आवड म्हणून मॉडेलिंगही ती करत होती. मॉडेलिंगमुळेच तिने या इंडस्ट्रीत एंट्री केली. क्रिती आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. २७ जुलै १९९० रोजी नवी दिल्ली येथे पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या क्रितीचे वडील राहुल सॅनन चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि तिची आई गीता सॅनन दिल्ली युनिर्व्हसिटीमध्ये प्रोफेसर आहे. क्रितीने तिचे शालेय शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूलमधून केले आणि त्यानंतर तिने इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.टेक पूर्ण केलं. अभिनेत्री होण्यापूर्वी ती मॉडेलिंगच्या जगात नशीब आजमावत होती. क्रितीला एक बहीणही आहे. तीसुद्धा अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. तेलगू इंडस्ट्रीमध्ये ती प्रचंड प्रसिद्ध आहे. नुपूर सॅनन असं तिच नाव आहे. 

रसिकांची लाडकी आणि फेव्हरेट असलेल्या क्रितीच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही.  रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली क्रिती कोट्यावधीची मालकीण आहे.आलिशान आयुष्य आज ती जगते. क्रितीने तिच्या करिअरमध्ये 18 सिनेमांमध्ये काम केले आहे.क्रितीची  एकूण संपत्ती 32 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते.तिचे मासिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. एका सिनेमासाठी क्रिती जवळपास ४ कोटी रुपये मानधन घेते. इतकंच काय तर तिचा स्वतःचा एक ब्रँड देखील तिने लॉन्च केला आहे, यामाध्यमातूनही ती भरपूर कमाई करते. तिचे वार्षिक उत्पन्न ५ कोटींहून अधिक आहे.अनेक आलिशान आणि महागड्या गाड्यांचं कलेक्शन तिच्याकडे आहे. Audi Q7, कीमत 70 लाखहून जास्त आहे. इतकंच काय तर जवळपास 50 लाखाची BMW 3 Series आहे. नुकतेच तिने Mercedes Benz Maybach GLA 600 खरेदी केली आहे जिची किंमतही करोडोंमध्ये आहे.मुंबईतील तिच्या फ्लॅटची किंमत जवळपास ६० कोटींच्या घरात आहे.

क्रितीने  2014 मध्ये सुकुमारच्या तेलुगू सिनेमा  नाम '1: नेनोक्कडीने'मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यामध्ये ती महेश बाबूसोबत दिसली होती. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती टायगर श्रॉफसोबत 'हिरोपंती' या अॅक्शन सिनेमात दिसली होती. यानंतर क्रितीने मागे वळून पाहिले नाही आणि दाक्षिणात्य-हिंदी सिनेमांमध्ये ती बिझी झाली.

टॅग्स :क्रिती सनॉन