Join us

क्रिती सॅनन आहे प्रेग्नंट ? बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2020 13:55 IST

अभिनेत्री क्रिती सॅननचा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे

अभिनेत्री क्रिती सॅननचा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. या फोटोत क्रिती ती प्रेग्नेंट दिसतेय. सडपातळ दिसणारी क्रितीने या फोटोत वजन वाढवलेले दिसतेय. क्रितीचा हा फोटो आहे मिमीच्या सेटवरचा. मिमीसाठी क्रितीने तब्बल 15 किलो वजन वाढवले आहे. यात क्रिती एका सरोगेट मदरची भूमिका साकारणार आहे. महिलाप्रधान हा सिनेमा असून त्याची कथा महिलाच पुढे नेते. मराठीत आलेल्या 'मला आई व्हायचंय' या सिनेमावर आधारित हा सिनेमा असणार आहे. त्यामुळे सिनेमात काहीसा भावनिक अँगलही पाहायला मिळेल. 

या सिनेमात पंकज त्रिपाठी, सुप्रिया पाठक आणि सई ताम्हणकर दिसणार आहे. लक्ष्मण उत्तेकर या सिनेमाचे दिग्दर्शन करतायेत.  या सिनेमाला घेऊन क्रिती खूपच उत्साही आहे. 

‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री क्रिती सॅनन आजघडीला इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत आहे. मॉडेलिंग, तेलगू चित्रपट आणि बॉलिवूड असा तिचा प्रवास राहिला. क्रिती 'लुका छिपी', 'कलंक' आणि 'अर्जुन पटियाला' यांसारख्या सिनेमात झळकली होती. यावर्षी तिचे 'हाउसफुल 4' आणि 'पानिपत' असे दोन चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळाले. आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये क्रितीची गणना केली जाते. ती खासकरून तिच्या फिटनेस आणि हॉट फिगरमुळेही लोकप्रिय आहे. अनेक तरुणी तिला फॉलो करतात.

टॅग्स :क्रिती सनॉन