Join us

क्रिती सनॉननं ८ वर्षांनी लहान बॉयफ्रेंड सोबतचे फोटो केले शेअर, कधी बांधणार लग्नगाठ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 09:21 IST

खुद्द क्रितीनं कबीरसोबतचे नवीन फोटो शेअर करुन त्यांचे नाते अधिकृत केल्याचं दिसतंय.

Kriti Sanon With Boyfriend Kabir Bahia: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री क्रिती सनॉन पुन्हा एकदा तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. बऱ्याच काळापासून तिचे नाव कबीर बाहियाशी जोडले जात आहे. आता खुद्द क्रितीनं कबीरसोबतचे नवीन फोटो शेअर करुन त्यांचे नाते अधिकृत केल्याचं दिसतंय. हे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत. या फोटोमधील दोघांच्या जवळीकने सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधले आहे.

क्रिती सॅननने २६ ऑक्टोबर रोजी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर कबीर बाहियासोबतच्या एका रोमँटिक आऊटिंगचे फोटो शेअर केले. दोघेही अबू धाबी येथील एतिहाद अरेना (Etihad Arena) येथे आयोजित करण्यात आलेल्या UFC 321 या फाईट नाईटसाठी उपस्थित होते. विशेष म्हणजे, यावेळी त्यांच्यासोबत अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) देखील होता. 

क्रिती आणि कबीर यांच्या डेटिंगच्या अफवा तेव्हापासून सुरू झाल्या, जेव्हा क्रितीने ग्रीसमध्ये कबीरसोबत तिचा ३४ वा वाढदिवस साजरा केला होता. ते दोघे एकत्र वेळ घालवत असतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ तेव्हा व्हायरल झाले होते.  त्यानंतर अनेक सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही दोघांना एकत्र पाहिले गेले आहे.

कामाच्या आघाडीवर बोलायचे झाल्यास, क्रिती सध्या दिग्दर्शक आनंद एल. राय (Aanand L. Rai) यांच्या आगामी "तेरे इश्क में" (Tere Ishq Mein) या चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात क्रितीसोबत अभिनेता धनुष (Dhanush) मुख्य भूमिकेत आहे. हा रोमँटिक चित्रपट येत्या २८ नोव्हेंबर रोजी जगभरात हिंदी आणि तमिळ अशा दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरला आणि टायटल ट्रॅकला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

कोण आहे कबीर बहिया?

कबीर बहिया हा एक ब्रिटीश व्यापारी असून त्याने आपले शालेय शिक्षण इंग्लंडमधील बोर्डिंग स्कूलमधून केले आहे. तो वर्ल्डवाइड एव्हिएशन अँड टुरिझम लिमिटेडचे ​​संस्थापक देखील आहे. यूके स्थित ट्रॅव्हल एजन्सी साउथॉल ट्रॅव्हलचे मालक कुलजिंदर बहिया यांचा तो मुलगा आहे. कबीर हा भारतीय क्रिकेटपटू एमएस धोनीच्याही जवळचा आहे. तो धोनीचा मेहुणा आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kriti Sanon Shares Photos with Younger Boyfriend; Marriage Soon?

Web Summary : Kriti Sanon confirms relationship with Kabir Bahia, sharing romantic photos from Abu Dhabi. Dating rumors began after their Greece trip. Sanon is currently preparing for her upcoming film "Tere Ishq Mein" with Dhanush.
टॅग्स :क्रिती सनॉनमहेंद्रसिंग धोनी