Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिती सनॉनने कबीर बहियासोबतचं रिलेशन केलं कन्फर्म? रुमर्ड कपलने एकत्र सेलिब्रेट केली दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 13:21 IST

Kriti Sanon : क्रिती सनॉनने तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर अभिनेत्री कबीर बहियाला डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं असेल.

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन(Kriti Sanon)नेही आपल्या कुटुंबासोबत दिवाळीचा सण घरीच साजरा केला. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटोही शेअर केले आहेत. एका फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. खरेतर, अभिनेत्रीचा कथित बॉयफ्रेंड कबीर बहिया देखील फोटोमध्ये दिसत आहे. म्हणजेच क्रितीने कबीर बहियासोबत दिवाळी साजरी केली. यासोबतच क्रितीने अधिकृतपणे काहीही जाहीर केले नसले तरी कबीर बहियासोबत ती रिलेशनशीपमध्ये असल्याची अटकळ बांधली जात आहे. 

क्रिती सनॉनने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला फोटो अल्बम एका कौटुंबिक फोटोने सुरू झाला, ज्यामध्ये तिचे आई-वडील राहुल आणि गीता सेनन तसेच तिची अभिनेत्री बहीण नुपूर सेनन देखील दिसत आहेत. यानंतर नुपूर आणि तिचा बॉयफ्रेंड स्टेबिन बेन देखील क्रिती आणि कबीर बहियासोबत सेल्फीमध्ये दिसत आहेत. फोटोमध्ये, अभिनेत्री नेव्ही ब्लू आणि गोल्डन सूट सेटमध्ये सुंदर दिसत होती, तर तिच्या रुमर्ड बॉयफ्रेंडने देखील इलेक्ट्रिक ब्लू कुर्ता-पँट सेट घातला होता. तिचे केस आणि मेकअप आर्टिस्ट एड्रियन जेकब्स आणि आसिफ अहमद देखील फोटोमध्ये होते. दुसऱ्या फोटोत, फुकरे अभिनेता वरुण शर्मा आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबरा पारंपारिक कपड्यांमध्ये क्रितीसोबत दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, “परिवार आणि मित्रांसोबत दिवाळी. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!!"

अशी सुरू झाली चर्चाखरेतर कबीरने क्रिती सनॉनच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट केली होती ज्यानंतर लोकांनी ते रिलेशनशीपमध्ये असल्याचा अंदाज बांधला होता. जेव्हा क्रितीने UP T20 सीझन 2 च्या लॉन्चिंग इव्हेंटमधील तिच्या अप्रतिम कामगिरीचा BTS व्हिडिओ पोस्ट केला तेव्हा ही अटकळ सुरू झाली. मात्र, या कथित जोडप्याने अद्याप या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वर्कफ्रंटवर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी क्रिती सनॉन कॉमेडी-ड्रामा चित्रपट क्रूमध्ये तब्बू आणि करीना कपूर खानसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता क्रिती आणि काजोल अभिनीत दो पत्ती २५ ऑक्टोबर २०२४ रोजी OTT वर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात क्रितीने दुहेरी भूमिका साकारली आहे.

टॅग्स :क्रिती सनॉन