Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमिताभ बच्चन यांच्या घरात भाड्याने राहायला गेली क्रिती सेनॉन, महिन्याचं भाडे वाचून पांढरे पडतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 18:42 IST

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी हा फ्लॉट एप्रिल 2021 मध्ये 31 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीला तो खरेदी केला आहे.

बॉलिवूड मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची मुंबईसह देश-विदेशात कोट्यवधींची संपत्ती (property)  आहे. त्यांचा अंधेरी येथे डुप्लेक्स फ्लॅटही आहे. हा फ्लॅट क्रिती सेनॉनने (kriti sanon) भाड्याने घेतला आहे. क्रितीने हा फ्लॅट 2 वर्षांसाठी भाड्याने घेतला आहे.

मनीकंट्रोल.कॉमच्या रिपोर्टनुसार, क्रिती सेनॉनचा  (kriti sanon)  हा भाडे करार १२ नोव्हेंबर रोजी झाला आहे. हा करार ऑक्टोबर 2021 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीसाठी आहे. या फ्लॅटसाठी क्रिती सेनॉनने  (kriti sanon)  ६० लाख रुपये डिपॉजिट दिले आहेत. या फ्लॅटच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 26 आणि 27व्या मजल्यावर हा फ्लॉट आहे. .

अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यानी आपला जुहूमधील बंगला अम्मू आणि वत्सचा ग्राउंड फ्लोर स्टेट बॅंक ऑफ इंडियाला (State Bank Of India) रेंटवर दिला आहे. १५ वर्षांसाठी लीजवर दिलेल्या आहे.प्रॉपर्टी भाड्याने दिल्यावर बच्चन परिवाराला बॅंकेकडून दर महिन्याला १८.९ लाख रूपये भाडं मिळणार आहे.५ वर्षानंतर या प्रॉपर्टीच्या रेंटमध्ये वाढ होईल. ज्यानुसार पुढील पाच वर्षात त्यांना हे रेंट वाढून दर महिन्याला २३.६ लाख रूपये मिळतील. आणि नतंर १० वर्षानंतर पुढील पाच वर्षापर्यंत बच्चन परिवाराला २९.५ लाख रूपये महिना रेंट मिळेल. अमिताभ बच्चन यांच्या प्रमाणे बॉलिवूडमध्ये असे बरेच कलाकार आहेत ज्यांनी आपली प्रॉपर्टी लीजवर दिली आहे.  

 

टॅग्स :अमिताभ बच्चनक्रिती सनॉन