Join us

आजारपणात कृति खरबंदाची झाली अशी अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली - लवकर होईन बरी

By तेजल गावडे | Updated: November 6, 2020 20:56 IST

कृति खरबंदाने इंस्टाग्रामवरील स्टोरीच्या माध्यमातून तिला मलेरिया झाल्याचे सांगितले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सिनेइंडस्ट्रीला चांगलाच फटका बसला आहे. त्यात काही कलाकारांना कोरोनाची लागणही झाली होती. यादरम्यान आता अभिनेत्री कृति खरबंदा आजारी असून तिला मलेरिया झाला आहे. हे खुद्द तिनेच सोशल मीडियावर सांगितले आहे.

कृति खरबंदा हिने मलेरिया झाल्याचे आपल्या चाहत्यांना सोशल मीडियावर सांगितले. तिने इंस्टा स्टोरीवर तिचा एक फोटो शेअर करत लिहिले की, हॅलो, हा माझा मलेरियावाला चेहरा आहे. हा आजार जास्त दिवस राहणार नाही. मी लवकरच ठीक होईन कारण मला कामाला पुन्हा सुरूवात करायची आहे.

कृतिच्या तब्येतीत पूर्वीपेक्षा बरीच सुधारणा झाली आहे. पुढे तिने सांगितले की, जे लोक मला पाहून चिंतेत आहेत त्यांना सांगू इच्छिते की आता माझ्या तब्येतीत सुधारणा आहे. मला आशा आहे की उद्या आणखीन चांगला असेल. २०२० ने मला संयम ठेवायला आणि स्वतःवर प्रेम करायला शिकविले आहे.

कृति खरबंदा पहिल्यांदा तमीळ चित्रपट बोनीमध्ये झळकली होती. हा चित्रपट २००९ साली थिएटरमध्ये रिलीज झाला होता. चार वर्षांपूर्वी कृतिने बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. तिने इमरान हाश्मीसोबत राजः रिबूट चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नुकतीच ती बिजॉय नंबियारचा चित्रपट तैशमध्ये पुलकित सम्राट, जिम सरभ, हर्षवर्धन राणे आणि संजिदा शेखसोबत झळकली होती.

टॅग्स :कृति खरबंदा