Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकी श्रॉफच्या घरात लवकरच वाजणार सनई चौघडे, या व्यक्तीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2020 14:01 IST

वेळेसोबत आमचं नातं अधिक मजबूत होतं गेले.

कृष्णा श्रॉफ बॉलिवूडमध्ये सक्रीय नसली तरी तिचे सोशल मीडियावर फॉलोव्हर्सची संख्या खूप आहे. ती सोशल मीडियावर नेहमी फोटो शेअर करत असते. कृष्णा श्रॉफने बॉयफ्रेंड एबन होम्ससोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत असते. कृष्णा बॉयफ्रेंडसोबतचे रोमान्स करतानाचे फोटो शेअर करत असते.

एबन होम्स  लाईव्ह चॅटच्या माध्यमातून फॅन्सशी कनेक्ट झाला होता. यादरम्यान त्याने आपल्या पर्सनल लाईफ बाबत अनेक खुलासे केले. काही फॅन्सनी त्याला कृष्णा आणि त्याच्या लग्नाबाबत प्रश्न विचारले. चाईव्ह चॅटमध्ये एबने विचारले की त्याने कृष्णा सोबत लग्न केले आहे का ?, यावर तो  म्हणाला, जर मी लग्न केले असत तर माझ्या हातात अंगठी दिसली असती. मात्र असे नाही आहे. एबनने लाईव्ह चॅटमध्ये म्हणाला, कृष्णा श्रॉफ मला माझ्या आईची आठवण करुन देते आणि मला माझ्या वडिलांसारखे व्हायचे आहे. कृष्णामध्ये ती गुण आहेत, जे आपण लोकांमध्ये शोधत असतो. याकारणामुळे वेळेसोबत आमचं नातं अधिक मजबूत होतं गेले.

कृष्णाचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची वाट पाहत आहेत. मात्र तिने बॉलिवूडमध्ये काम करण्यास नकार दिला आहे. ती फिटनेस फ्रीक असून वर्कआऊट करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

टॅग्स :कृष्णा श्रॉफटायगर श्रॉफ