Join us

​कृष्णा श्रॉफ करणार बॉलिवूड डेब्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2016 16:23 IST

अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ  बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. होय, भावाच्या पावलावर पाऊल ठेवत कृष्णाही ...

अभिनेता जॅकी श्रॉफची मुलगी आणि टायगर श्रॉफची बहिण कृष्णा श्रॉफ  बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. होय, भावाच्या पावलावर पाऊल ठेवत कृष्णाही बॉलिवूड पर्दापणासाठी सज्ज झाली आहे. पण थांबा..कृष्णा बॉलिवूडमध्ये येतेय, हे खरे आहे. पण अभिनय क्षेत्रात नाही तर दिग्दर्शनाच्या क्षेत्रात कृष्णा आपले नशीब आजमावणार आहे. भावाच्याच म्हणजे टायगरच्या आगामी ‘मुन्ना मायकल’ या चित्रपटात कृष्णा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहणार आहे. या चित्रपटाचे दिग्दशर््क शब्बीर खान खुद्द यांनीच टिष्ट्वटरही ही माहिती दिली. हॉट आणि ग्लॅमरस फोटो पोस्ट करून खळबळ माजवणारी कृष्णा आता दिग्दर्शन क्षेत्रात किती यशस्वी ठरते, ते येणारा काळ सांगणारच..!!