Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोण होणार जॅकी श्रॉफ यांचा जावई? लेकीनं शेअर केले 'त्या' खास व्यक्तीसोबतचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 17:08 IST

जॅकी श्रॉफची लाडकी लेक कृष्णा श्रॉफ सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे.

बॉलिवूडचा 'जॅग्वार' टायगर श्रॉफची बहीण आणि जॅकी श्रॉफची लाडकी लेक कृष्णा श्रॉफ सध्या आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत आली आहे. 'द ५०' या रिअॅलिटी शोमध्ये आपल्या दमदार व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या कृष्णाने अखेर तिच्या आयुष्यातील खास व्यक्तीचा खुलासा केला आहे. ती एका अफगाण मिक्स्ड मार्शल आर्ट्स सैनिकाला डेट करत असल्याची कबुली तिने दिली आहे.

शो दरम्यान कृष्णाने उघड केले की, ती अब्दुल अझीम बदख्शी याच्या प्रेमात आहे. अब्दुल हा मूळचा अफगाणिस्तानचा असून तो एक व्यावसायिक MMA फायटर आहे. कृष्णाने स्पष्ट केले की, तिला नेहमीच 'अल्फा मॅन' म्हणजेच मजबूत आणि आत्मविश्वासू पुरुष आवडतात आणि अब्दुलमध्ये तिला ते सर्व गुण दिसले. अब्दुलचे आव्हानात्मक व्यक्तिमत्व तिला सर्वात जास्त आकर्षित करते, असेही तिने सांगितले.

कृष्णा आणि अब्दुल यांच्या प्रेमकथेची सुरुवात सोशल मीडियाद्वारे झाली. नोव्हेंबर २०२० दरम्यान दोघांनी इन्स्टाग्रामवर चॅटिंग सुरू केले. आठ महिने बोलल्यानंतर त्यांची पहिली भेट बहरीनमध्ये झाली. भारतात आल्यानंतर कृष्णाने त्यांच्या पहिल्या डेटसाठी मुंबईच्या गजबजाटापासून दूर गोवा निवडला. तिथे घालवलेल्या वेळामुळे त्यांचे नाते अधिक घट्ट झाले.

विशेष म्हणजे, या जोडीमध्ये भाषेचा मोठा अडथळा होता. अब्दुल हा फारसीमध्ये बोलतो, तर कृष्णा इंग्रजीमध्ये अस्खलित आहे. मात्र, या दोघांचा सुवर्णमध्य ठरली ती म्हणजे 'हिंदी' भाषा. दोघेही सारख्याच प्रमाणात हिंदी बोलतात, ज्यामुळे त्यांच्यातील संवाद सोपा झाला. कृष्णानं सोशल मीडियावर अब्दुलसोबतचे अनेक रोमँटिक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत  आता चाहते त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Who will be Jackie Shroff's son-in-law? Daughter shares photos!

Web Summary : Krishna Shroff, Jackie Shroff's daughter, is dating Afghan MMA fighter Abdul Azim Badakhshi. They connected via social media, bridging a language gap with Hindi. Fans eagerly await their marriage announcement.
टॅग्स :जॅकी श्रॉफकृष्णा श्रॉफ