Join us

क्रिती सॅसन पडली 'बरेली की बर्फी'च्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2017 12:44 IST

नीतेशची पत्नी अश्विनी अय्यर तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करते आहे. या चित्रपटाची कथा फारच वेगळ्या पद्धतीने नीतेशने लिहिली असल्याचे ...

नीतेशची पत्नी अश्विनी अय्यर तिवारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करते आहे. या चित्रपटाची कथा फारच वेगळ्या पद्धतीने नीतेशने लिहिली असल्याचे क्रितीने सांगितले. तसेच कथा वाचताच क्षणी मला ती आवडली आणि मी लगेच होकार दिले असे ही क्रितीने एका मुलाखती दरम्यान सांगितले.  21 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटिला येणार आहे. क्रिती शिवाय या चित्रपटात आयुष्याम खुराना आणइ राजकुमार राव ही आपल्याला पाहायला मिळणार आहेत. बरेली की बर्फीमध्ये क्रिती यूपीसारख्या छोट्या शहरात राहणाऱ्या मुलीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाची ऑल मोस्ट सगळी शूटिंग पूर्ण झाली आहे. केवळ दोन किंवा तीन गाण्याचे चित्रिकरण बाकी आहे. क्रितीचा राबता चित्रपट जूनमध्ये रिलीज होणार आहे. याचित्रपटात तिच्यासोबत सुशांत सिंह राजपूत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. क्रितीने 2014मध्ये आलेल्या हिरोपंती चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती यात तिच्यासोबत टायगर श्रॉफ होता.काही दिवसांपूर्वी क्रिती डबिंग करायला आवडत नसल्याचे म्हटले होते. मात्र त्यानंतर क्रिती डबिंगची प्रोसेस एन्जॉय करताना दिसली. डबिंग करताना पुन्हा एकदा संपूर्ण चित्रपट जगायला मिळतो असे क्रिती म्हणाली. आपल्या यशस्वी डेब्यूनंतर क्रिती वरुण धवनसोबत रोहित शेट्टीच्या दिलवाले चित्रपटात दिसली होता. ज्यात शाहरुख खान आणि काजोल यांची प्रमुख भूमिका होती.