Join us

न्यूयॉर्कमध्ये इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये कोंकणाची छाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 13:22 IST

न्यूयॉर्क इंडियम फिल्म फेस्टिव्हल 2017 बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिने आपली छापा पाडली. कोंकणाने या चित्रपट दोन अॅवॉर्ड ...

न्यूयॉर्क इंडियम फिल्म फेस्टिव्हल 2017 बॉलिवूड अभिनेत्री कोंकणा सेन शर्मा हिने आपली छापा पाडली. कोंकणाने या चित्रपट दोन अॅवॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. कोंकणला  बेस्ट दिग्दर्शक आणि बेस्ट अभिनेत्री या दोन अॅवॉर्डने गौरवण्यात आले आहे. कोंकणाला तिचा पहिला चित्रपट अ डेथ इन द गंज या चित्रपटासाठी सर्वोत्कष्ठ दिग्दर्शकाचा अॅवॉर्ड पटकावला आहे. तर लिपस्टिक अंडर माय बुर्का या चित्रपटाताली अभिनयासाठी सर्वोत्कष्ठ अभिनेत्रीचा अॅवॉर्ड जाहिर करण्यात आला आहे. अ डेथ इऩ द गंज हा एक ड्रामा थ्रिलर चित्रपट आहे. यात रणवीर शौरी, विक्रांत मैसा, कल्कि कोचलिन, तुनजा, जिम सार्भ, गुलशन देवैया, तिलोतमा शोमे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.   लिपस्टिक अंडर माय बुर्का या चित्रपटाचे दिग्दर्शन अलंकृता श्रीवास्तवने केले आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने या चित्रपटाला सुरुवातीला सर्टिफिकेट देण्यास नकार दिला होता.काही दिवसांपूर्वीच हॉलिवूड फॉरेन प्रेस असोसिएशनने लिपस्टिक अंडर माय बुर्का ला गोल्डन ग्लोब्समध्ये स्क्रिनिंगसाठी सिलेक्ट केले होते. प्रकाश झा च्या प्रोडक्शन हाऊस तर्फे तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाला मुंबईत झालेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कष्ठ ऑक्सफैम अॅवॉर्ड मिळाला आहे.