कोकणा करतेय शॉर्टफिल्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 06:22 IST
फि ल्म इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा शॉर्ट फिल्मचा ट्रेंड आला आहे. नावाजलेले अभिनेता-अभिनेत्रीही ...
कोकणा करतेय शॉर्टफिल्म
फि ल्म इंडस्ट्रीमध्ये पुन्हा एकदा शॉर्ट फिल्मचा ट्रेंड आला आहे. नावाजलेले अभिनेता-अभिनेत्रीही यात इंटरेस्ट घेत आहेत. यात आता कोंकणा सेन शर्माही आली आहे. लवकरच कोकणाची 'नयनतारास नेकलेस' ही २0 मिनीटांची थ्रिलर शॉर्टफिल्म येत आहे. यामुळे ती सध्या उत्साहात आहे. या फिल्मचे आणखी एक वैशिष्ठय़ म्हणजे ही फिल्म चित्रपटगृहांऐवजी डीजीटल प्लॅटफॉर्मवर म्हणजेच ऑनलाईन प्रदर्शित होणार आहे. याबाबत बोलताना कोकणा म्हणाली, 'आधी शॉर्टफिल्मला आपली ओळख बनविण्यासाठी विषेश मेहनत घ्यावी लागत होती पण आता काळ बदलला आहे. अनुराग कश्यप पासून ते सुधीर मिश्रा पर्यंत अनेक दिग्दर्शकांनी शॉर्टफिल्म बनवले आहेत आणि दर्शकांच्याही ते पसंतीला उतरत आहेत.' पुढे बोलताना ती म्हणाली की,' या शॉर्टफिल्मच्या आधी 'वेबिसोड' चा अर्थ तिला माहित नव्हता. शॉर्टफिल्म चा कं टेन्ट बेस पाहून तिने हे साईन केले आहे. वेबिसोड म्हणजे वेब-एपिसोड.'