Join us  

Taapsee Pannu : माझं सेक्स लाईफ इतकं इंटरेस्टिंग नाही..., तापसी पन्नू असं का म्हणाली?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2022 5:52 PM

Taapsee Pannu : तापसी पन्नू बेधडक बोलते. सध्या तिच्या अशाच एका बेधडक वक्तव्याची चर्चा होतेय...

करण जोहरच्या ( Karan Johar) ‘कॉफी विद करण’ या चॅट शोचा 7 वा सीझन ( Koffee With Karan 7) सुरू झाला आहे आणि आत्तापर्यंत आलिया भट, रणवीर सिंगपासून जान्हवी कपूर, अक्षय कुमार, आमिर खान, करीना कपूर खानपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी या शोमध्ये हजेरी लावली आहे. अगदी साऊथची सामंथा रूथ प्रभु आणि विजय देवरकोंडा हेही या सीझनमध्ये दिसले. सर्वांनीच या शोमध्ये आपल्या आगामी सिनेमाचं प्रमोशन केलं. तुम्हाला ठाऊक असेलच की, अभिनेत्री तापसी पन्नू हिचाही (Taapsee Pannu) ‘दोबारा’ हा सिनेमा सुद्धा लवकरच रिलीज होतोय. पण ‘कॉफी विद करण 7’ या शोसाठी तापसीला आमंत्रितच करण्यात आलेले नाही. असं का? तर एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये खुद्द तापसीनेच याचं उत्तर दिलं.

‘कॉफी विद करण 7’मध्ये जाणार का? असा प्रश्न एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये तापसीला विचारला गेला. यावर तापसीने काय उत्तर दिलं माहितीये? ती अगदी बेधडक बोलली. ‘करणच्या शोमध्ये जाण्याइतकं माझं सेक्स लाईफ इंटरेस्टिंग नाही,’ असं ती म्हणाली.तिचं हे उत्तर नेटकऱ्यांना भलतंच आवडलं. सध्या सोशल मीडियावर त्याचीच चर्चा आहे. तापसी अगदी खरं बोलली, असं अनेकांनी यावर म्हटलं आहे.

करण जोहरचा ‘कॉफी विद करण’ हा शो खूप लोकप्रिय आहे. या शोमध्ये बॉलिवूड स्टार्सना त्यांच्या चित्रपटांच्या प्रमोशनसाठी बोलावलं जांत. आता तर करणच्या या शोमध्ये साऊथचे सेलिब्रिटीही दिसू लागले आहे. अलीकडेच साऊथ अभिनेत्री सामंथा रूथ प्रभु अक्षय कुमारसोबत शोमध्ये आली होती. याशिवाय विजय देवरकोंडा त्याच्या ‘लाईगर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आला होता.

करण जोहरच्या शोमध्ये सध्या सेक्स लाईफबद्दल बरीच चर्चा होत आहे. ‘कॉफी विद करण’च्या एका एपिसोडमध्ये करणने करिना कपूरला तिच्या सेक्स लाईफबद्दल विचारलं होतं.  विजय देवरकोंडा याला सुद्धा थ्रीसम आणि त्यांच्या सेक्स लाईफबद्दल त्याने प्रश्न केला होता.  याशिवाय आलिया भट हिला तिच्या  हनीमूनबाबत प्रश्न केला होता.

टॅग्स :तापसी पन्नूकरण जोहरकॉफी विथ करण 6