Join us
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटानंतर अमृता सिंहने का केलं नाही दुसरं लग्न? अभिनेत्रीने सांगितलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:04 IST

Amrita singh: घटस्फोटानंतर सैफने त्याचा दुसरा संसार थाटला. परंतु, अमृताने सिंगल मदर होऊन मुलांचं पालकत्व स्वीकारलं.

बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त कोणाच्या घटस्फोटाची चर्चा झाली असेल तर ती म्हणजे अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंह (Amrita Singh) यांची. ही जोडी विभक्त होऊन आज बरीच वर्ष झाली. मात्र, तरीदेखील त्यांच्याविषयी नेटकऱ्यांमध्ये वरचेवर चर्चा होते. घटस्फोटानंतर सैफने त्याचा दुसरा संसार थाटला. परंतु, अमृताने सिंगल मदर होऊन मुलांचं पालकत्व स्वीकारलं. एका मुलाखतीमध्ये तिने दुसरं लग्न का केलं नाही, यामागचं कारण सांगितलं.

१९९१ मध्ये अमृता आणि सैफने लग्न केलं. त्यावेळी सैफचं वय २१ होतं. तर, अमृता ३३ वर्षांची होती. ज्यावेळी या जोडीने लग्न केलं तेव्हा अमृता एक यशस्वी अभिनेत्री होती. तर, सैफने त्याच्या करिअरला सुरुवातही केली नव्हती. त्यामुळे या दोन कारणांमुळे त्यांची बरीच चर्चा झाली. परंतु, या सगळ्याकडे दुर्लक्ष करत त्यांनी संसार केला.

सूत्रांच्या माहितीनुसार, सैफ आणि अमृता विभक्त होण्यामागे सैफची आई अभिनेत्री शर्मिला टागोर आणि बहिणी सबा, सोहा कारणीभूत असल्याचं म्हटलं जातं. या तिघींसोबत अमृताचे मतभेद होते. ज्यामुळे घरात वारंवार वाद व्हायचे. परिणामी, लग्नाच्या १३ वर्षानंतर या जोडीने २००४ मध्ये कायदेशीररित्या घटस्फोट घेतला.

'या' कारणामुळे अमृताने केलं नाही दुसरं लग्न

घटस्फोटानंतर २०१२ मध्ये सैफने करिना कपूरसोबत (Kareena Kapoor Khan) दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली. तर, अमृता आजही अविवाहित आहे. एका मुलाखतीमध्ये तिने दुसरं लग्न न करण्यामागचं कारण सांगितलं. घटस्फोटानंतर तिने तिच्या दोन्ही मुलांची सारा आणि इब्राहिम यांची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे मुलांचा योग्यरित्या सांभाळ व्हावा. त्यांच्या संगोपनात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तिने दुसरं लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Amrita Singh's reason for not remarrying after divorce revealed.

Web Summary : Amrita Singh, after divorcing Saif Ali Khan, chose not to remarry. She focused on raising her children, Sara and Ibrahim, prioritizing their well-being and upbringing above all else. Saif remarried Kareena Kapoor in 2012.
टॅग्स :अमृता सिंगबॉलिवूडसैफ अली खान करिना कपूरसेलिब्रिटी