Join us

​जाणून घ्या अक्षय कुमारच्या आयुष्यातील सगळ्यात आवडती व्यक्ती कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2017 15:50 IST

अक्षय कुमारच्या आयुष्यात असलेल्या या खास व्यक्तिमुळे अक्षय कुमार नुकताच भावुक झाला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. या व्यक्तीमुळे त्याने ...

अक्षय कुमारच्या आयुष्यात असलेल्या या खास व्यक्तिमुळे अक्षय कुमार नुकताच भावुक झाला असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. या व्यक्तीमुळे त्याने एक इमोशनल ट्वीट ट्विटरला केले होते. त्याच्या या ट्वीटला अनेकांनी लाइक केले असून अक्षयच्या अनेक फॅननने यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षयच्या आयुष्यात असलेली ही खास व्यक्ती ट्विंकल खन्ना नाहीये. आता अक्षयच्या आयुष्यात ट्विंकल पेक्षाही महत्त्वाची व्यक्ती कोण आहे असा तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल. अक्षयच्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची असणारी ही व्यक्ती ट्विंकल नसली तरी त्याच्याच घरातील एक व्यक्ती आहे. ही व्यक्ती म्हणजे ट्विंकल आणि त्याचा मुलगा आरव आहे.आरवचा आज वाढदिवस असून एका खास ढंगात अक्षयने त्याला ट्विटरवर विश केले आहे. आपल्या मुलाचा एक छानसा फोटो अक्षयने शेअर केला आहे आणि त्यासोबत एक इमोशनल संदेश देखील लिहिला आहे. अक्षयने ट्वीटसोबत लिहिले आहे की, झाडावर कसे चढायचे हे तुला मी शिकवले तर व्हिडिओ कॉल कसा करायचा हे मी तुझ्याकडून शिकलो. तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात आवडती व्यक्ती आहेस. तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा...