Join us
Daily Top 2Weekly Top 5

17 व्या वर्षी लग्न, घटस्फोट अन् लिव्ह-इन...; संजय दत्तच्या या अभिनेत्रीचं नाव ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 08:30 IST

आहे एका मुलाची आई...आता जगते सामान्य जीवन..

ठळक मुद्देअद्याप माहीनं लग्न केलेलं नाही. भविष्यात लग्न केलंच तर  ते तिचे दुसरे लग्न असेल. कारण वयाच्या 17 व्या वर्षी माहीने लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही.

संजय दत्त सोबत ‘साहब बीवी और गँगस्टर 3’ सारख्या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री माही गिलने (Mahie Gill) 2003 साली ‘हवाएं’ या चित्रपटाद्वारे आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली होती. पण,हा चित्रपट दणकून आपटला आणि मग माहीची दखल कोण घेणार? लोकांनी तिची दखल घ्यावी यासाठी 2006 साल उजाडावं लागलं. यावर्षी अनुराग कश्यपचा ‘देव डी’ आला आणि पहिल्यांदा माहीचा चेहरा सर्वांच्या डोळ्यात भरला. या चित्रपटाने तिला खरी ओळख दिली. यापुढच्या करिअरमध्ये माही अनेक चित्रपटांत दिसली. पण या चित्रपटांपेक्षा पर्सनल लाईफमुळेच ती चर्चेत राहिली.

2019 साली माहीनं असा काही खुलासा केला की, तो ऐकून सगळेच थक्क झाले होते. होय, ‘मी दीर्घकाळापासून लिव्ह इनमध्ये असून माझी एक मुलगी आहे,’ असं माहीने सांगितलं होतं. तोपर्यंत माहीचा कुणी बॉयफ्रेन्ड आहे, हे कुणाच्याही गावी नव्हतं. मला मुलगी आहे, हा तिचा खुलासाही चाहत्यांसाठी धक्कादायक होता. ही मुलगी तिने  दत्तक घेतलीय की तिला जन्म दिला हे मात्र अद्यापही स्पष्ट नाही. माहीच्या मुलीचे  नाव वेरोनिका आहे. ‘मी अद्याप लग्न केलेलं नाही. लग्नाआधीही मुलं जन्मास घातली जाऊ शकतात. मला यात काहीही अडचण नाही. लग्न एक सुंदर भावना आहे. पण ते करायचं की नाही, हा तुमचा खासगी निर्णय आहे,’ असंही ती म्हणाली होती.

अद्याप माहीनं लग्न केलेलं नाही. भविष्यात लग्न केलंच तर  ते तिचे दुसरे लग्न असेल. कारण वयाच्या 17 व्या वर्षी माहीने लग्न केलं होतं. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही.माहीचे खरं नाव रिम्पी कौर गिल आहे. चंदीगडच्या माहीनं  आतापर्यंत जवळ पास ३३ चित्रपटां मध्ये काम केले आहे. खोया खो या चांद, देव डी, गुलाल, दबंग, साहब बीवी और गँगस्टर, साहब बीवी और गँगस्टर रिटर्न्स, साहब बीवी और गँगस्टर 3, माइकल, पानसिंह तोमर, दबंग 2, जंजीर, बुलेट राजा, अपहरण आणि दु र्गामती या चित्रपटांचा समावेश आहे. 

टॅग्स :माही गिल