Join us

करिनाच्या वाढदिवासानिमित्त जाणून घ्या या रंजक ९ गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2016 12:20 IST

बॉलीवूडची ‘बेगम’ करिना कपूर-खान आज ३६ वर्षांची झाली आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध ‘कपूर’ कुटुंबात तिचा जन्म झाला. मोठी बहीण ...

बॉलीवूडची ‘बेगम’ करिना कपूर-खान आज ३६ वर्षांची झाली आहे. चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध ‘कपूर’ कुटुंबात तिचा जन्म झाला. मोठी बहीण करिश्मा कपूरच्या पाऊलावर पाऊल ठेवून ती अभिनयाच्या क्षेत्रात आली. सोळा वर्षांपूर्वी अभिषेक बच्चनसह तिने ‘रिफ्युजी’ (२०००) या चित्रपटातून चंदेरी दुनियेत पहिले पाऊल ठेवले आणि तेव्हापासून ती आपल्या मनमोहक सौंदर्य आणि अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतेय.इंडस्ट्रीमधील सर्वाधिक कमाई करणाºया अभिनेत्रींपैकी ती एक आहे. बॉक्स आॅफिसवरील लोकप्रियतेबरोबरच समीक्षकांनीसुद्धा तिच्या अभिनयाची वेळोवेळी दखल घेतलेली आहे. आतापर्यंत तिला सहा फिल्मफेयर्स पुरस्कार मिळालेले आहेत. ‘जब वुई मेट’, ‘ओंकारा’, ‘चमेली’ हे चित्रपट तिच्या करिअरमध्ये माईलस्टोन ठरले. तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तिच्याबद्दलच्या अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला कदाचित माहित नसतील.१. मधुर भंडारकर दिग्दर्शित ‘हीरोईन’ या चित्रपटात बेबोने तब्बल १३८ डिझायनर ड्रेसेस परिधान केले होते. त्यामुळे स्टारच्या कॉस्ट्युमवर एका चित्रपटात सर्वाधिक खर्च करणारा हा चित्रपट ठरला.२. करिनाला अप्रमाणिक लोक बिल्कुल आवडत नाही. तिने एका मुलाखतीत सांगितले होते की, सैफ जर तिच्याशी अप्रमाणिक वागला तर ती त्याचे बरे-वाईट करण्यास मागे पुढे पाहणार नाही.३. करिनाचे नाव लिओ टॉलस्टॉय लिखित जगप्रसिद्ध कादंबरी ‘अ‍ॅना करिनिना’ वरून प्रेरित होऊन ठेवण्यात आले होते. तिच्या जन्माच्या आधी तिची आई बबिता ही कादंबरी वाचत होती.४. करिना योग करण्यात खूप एक्स्पर्ट आहे. एका बैठकीत ती सुमारे ५० सुर्यनमस्कार करू शकते. अवघड योगासनेदेखील ती सहज तीस सेंकदांपेक्षा जास्त वेळ करू शकते.५. अनेक वेळा तिच्या हातून ब्लॉकबस्टर सिनेमे गेले आहेत. ‘कहो ना प्यार है’ आणि ‘कल हो ना हो’ हे सिनेमे आधी तिला आॅफर करण्यात आले मात्र तिने ते सोडले आणि नंतर पश्चाताप करावा लागला.६. बेबो स्वत:ला खवय्यी मानते. इटालियन खाद्यपदार्थ तिचे सर्वात आवडीचे आहेत. ‘स्पगेटी’ म्हणजे तिच्या सर्वात आवडीची डिश आहे.७. ‘देव’ चित्रपटात तिने सर्व प्रथम गाणे गायिले होते. चित्रपट जरी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरू शकला नसला तरी तिच्या आवाजातील ‘जब नहीं आये थे’ या गाण्याचे बरेच कौतुक झाले.८. बॉक्स आॅफिसवर सुपरहीट असलेली करिना ‘शंभर कोटी’ कमावणाºया चार चित्रपटांचा हिस्सा होती. अशी कामगिरी करणारी ती एकमेव अभिनेत्री आहे.९. शाहीद कपूरसोबतचे अफेयर तर जगजाहीर आहे. मात्र सुरुवातीच्या काळात हृतिकसोबत असलेल्या सिक्रेट रिलेशनशिपबद्दल तिने कमालीची गुप्तता पाळली होती.