Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतसिंग राजपूतसोबतच्या नात्यावर क्रिती सॅननने केला मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2017 13:47 IST

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगत आहेत. ‘राब्ता’ या चित्रपटात एकत्र झळकलेल्या या ...

अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि क्रिती सॅनन यांच्या अफेअरच्या चर्चा सध्या चांगल्याच रंगत आहेत. ‘राब्ता’ या चित्रपटात एकत्र झळकलेल्या या दोघांमध्ये सध्या प्रेम बहरत असल्याचे अनेकांना वाटते; परंतु दोघांपैकी कोणाकडून यास दुजोरा दिला गेला नसल्याने अनेकांना संभ्रम आहे. विशेष म्हणजे जेव्हा हे दोघे आयफा इव्हेंटसाठी न्यूयॉर्कला गेले होते, तेव्हा ते एकमेकांशिवाय एक क्षणही दूर राहत नव्हते. दरम्यान, डीएनएसोबत दिलेल्या एका स्पेशल मुलाखतीत क्रितीने सुशांतसोबतच्या नात्यावरून एक मोठा खुलासा केला आहे. क्रितीने म्हटले की, ‘तुमच्याविषयी जे काही लिहिले जाते, त्या प्रत्येक मुद्द्यावर स्पष्टीकरण देणे शक्य नसते. त्यामुळे अशा काही गोष्टींकडे फारसे लक्ष न देता तुम्ही तुमच्या कामावर फोकस करायला हवे.’ क्रितीच्या मते, ‘जेव्हा तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये एंट्री करता तेव्हा तुम्हाला तुमचे कातडे जाड करावे लागते. कारण तुम्हाला प्रत्येक मुद्द्यावर रिअ‍ॅक्ट करता येत नाही. त्याचबरोबर प्रत्येक मुद्द्यावरून तुम्ही स्वत:ला प्रभावित करून घेण्यात काहीच अर्थ नसते. असे बºयाचदा होते, जेव्हा लोक तुमच्याविषयी नकारात्मक बोलताना तुम्हाला बघावयास मिळतात. त्यावेळी तुम्हाला काही प्रमाणात वाईटही वाटते. मात्र त्यावर उत्तर देणे तुम्हाला शक्य होत नाही. पुढे बोलताना क्रितीने म्हटले की, अशा गोष्टी माझ्या आयुष्यात फारसे महत्त्व ठेवत नाही. त्यामुळे जेव्हा-केव्हा तुमच्याबद्दल कोणी नकारात्मक बोलत असेल तर त्याला जाणीव करून द्यायला हवी की, याचा तुमच्यावर काहीच परिणाम होणार नाही. जसे सोशल मीडियावर ब्लॉकचे आॅप्शन असते, तसेच तुम्ही तुमच्या आयुष्यातूनही अशा गोष्टी ब्लॉक करायला हव्या. क्रितीचे हे वक्तव्य बरेच काही सांगणारे असून, सुशांतविषयी तिच्या मनात नेमके काय आहे, हे स्पष्ट करणारे ठरते. त्याचबरोबर सुशांतबद्दल तिच्या मनात तशी फिलिंग नसावी, असेही अप्रत्यक्षरीत्या जाणवते. असो, सुशांत आणि क्रितीने वेळोवेळी अशाप्रकारची उत्तरे देऊन त्यांच्यातील नात्यावरील चर्चेला पूर्णविराम दिला आहे. मात्र जोपर्यंत दोघांकडून याविषयी स्पष्टपणे बोलले जाणार नाही, तोपर्यंत चाहत्यांमध्ये त्यांच्यातील अफेअरच्या चर्चा रंगणार, यात शंका नाही.