किशोर कुमार यांचे बायोपिक कन्फर्म; हिरोही कन्फर्म! पण...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 16:08 IST
आपल्या अदाकारीने आणि गायकीने सिनेप्रेमींना वेड लावणारे किशोर कुमार यांचा जीवनप्रवास पडद्यावर बघायला कुणाला आवडणार नाही? किशोर कुमार यांच्या ...
किशोर कुमार यांचे बायोपिक कन्फर्म; हिरोही कन्फर्म! पण...!!
आपल्या अदाकारीने आणि गायकीने सिनेप्रेमींना वेड लावणारे किशोर कुमार यांचा जीवनप्रवास पडद्यावर बघायला कुणाला आवडणार नाही? किशोर कुमार यांच्या आयुष्यावर बायोपिक येणार, हे ऐकून सिनेप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अजूनही ही उत्सुकता कायम आहे. केवळ सिनेप्रेमीचं नाही तर या बायोपिकची घोषणा करणारे दिग्दर्शक अनुराग बासू हेही या बायोपिकसाठी तितकेच उत्सूक आहेत. बायोपिकसाठी रणबीर कपूर हा हिरोही फायनल झाला आहे. तो सुद्धा सुपर एक्साईटेड आहे. पण...!! होय, या बायोपिकच्या मार्गात एक मोठा ‘पण’ आहे.अनुराग बासू यांनी हा ‘पण’ कोणता ते सांगितले आहे. बासूंना अलीकडे या बायोपिकबद्दल विचारण्यात आले. यावर किशोर कुमार यांच्या आयुष्यावरील बायोपिक १०० टक्के कन्फर्म असल्याचे सांगितले. अर्थात पुढे त्यांच्या बोलण्यात ‘पण’ आलाच.बायोपिक कन्फर्म आहे. मी कन्फर्म आहे, रणबीर कपूरही कन्फर्म आहे. चित्रपटाची स्क्रिप्टही तयार आहे. पण एवढे असूनही सध्या आम्ही या बायोपिकची घोषणा करू शकत नाही. कारण यासाठी संपूर्ण प्रूफची गरज आहे. किशोर कुमार यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टी पडद्यावर दाखवण्याआधी त्यांच्याशी संबंधित सर्व लोकांच्या परवानगीची गरज आहे. रिलीजच्या वेळी कुठलीही अडचण यायला नको, म्हणून ही परवानगी गरजेची आहे,, असे बासू म्हणाले. हीच परवानगी सध्या किशोर कुमारच्या बायोपिकच्या मार्गातील ‘पण’ ठरला आहे. अर्थात हा ‘पण’ तसा फार मोठा नाही. कारण किशोर कुमार यांच्या कुटुंबाचा या बायोपिकसाठी तसा नकार नाहीच. उलट त्यांचे अख्खे कुटुंब बासूला मदत करतेय. किशोर कुमार यांच्या आयुष्यावर बायोपिक यावे, ही स्वत: त्यांच्या कुटुंबाचीच इच्छा आहे. अर्थात तरिही काही तांत्रिक अडचणी असतात. कदाचित बासू याच अडचणी दूर करण्याच्या कामात लागले आहेत. या अडचणी लवकरात लवकर दूर होवोत आणि प्रेक्षकांना किशोर कुमार यांचा जीवनपट पडद्यावर पाहायला मिळो, हीच काय अपेक्षा.ALSO READ : सततच्या अपयशाला कंटाळून रणबीर कपूरने मानला ज्योतिषाचा सल्ला! वाचा सविस्तर!!तूर्तास रणबीर कपूर संजय दत्तच्या बायोपिकमध्ये बिझी आहे. हे बायोपिक संपताच रणबीर अयान मुखर्जीच्या ‘ड्रगन’ या चित्रपटात बिझी होणार आहे.