किंगखानचा आर्यन, सुहानाबद्दल खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2016 16:29 IST
किंगखान शाहरूख खान याची तिन्ही मुले आर्यन, सुहाना आणि अबराम सतत चर्चेत असतात. स्टार किड्स असल्याने त्यांचे चर्चेत राहणे ...
किंगखानचा आर्यन, सुहानाबद्दल खुलासा
किंगखान शाहरूख खान याची तिन्ही मुले आर्यन, सुहाना आणि अबराम सतत चर्चेत असतात. स्टार किड्स असल्याने त्यांचे चर्चेत राहणे साहजिक आहे. त्यामुळे शाहरूखसोबतच त्याच्या मुलांची लहानसहान गोष्टही बातमी ठरते. काही दिवसांपूर्वी शाहरूखची मुलगी सुहाना यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ‘हॉट स्लिपींग ब्युटी’ असे या फोटोचे वर्णन केले गेले. एकंदर टिष्ट्वटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून असे अनेक फोटो व्हायरल होत असतात. पण आता शाहरूखने यासंदर्भात एक खुलासा केला आहे. तो म्हणजे, आर्यन आणि सुहानाच्या सोशल अकाऊंटबद्दल. आर्यन आणि सुहाना टिष्ट्वटरवर नाही. त्यांचे फेसबुक अकाऊंटही नाही, असे त्याने स्पष्ट केले. त्या दोघांचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. मात्र मला त्याबद्दल माहिती नाही. कारण मला त्यांना फॉलो करण्याची परवानगी नाही. हे माझे डॅड, ही माझी मम्मी, हा माझा भाऊ असे म्हणणारे किंवा तसा दावा करीत फोटो टाकणारे आर्यन आणि सुहाना नाही. ते असे करूच शकत नाहीत. कारण असे काही झाले की, ते माझ्याकडे येतात आणि तुम्ही टिष्ट्वट करून यासंदर्भात खुलासा करा, अशी मला गळ घालतात, असेही शाहरूखने सांगितले. आर्यन, सुहानाच्या फॅन क्लबबद्दल मी काहीही बोलणार नाही. खरे तर त्यांचे फॅन क्लब्स असण्याची गरजही नाही, असेही शाहरूख म्हणाला.