Join us

हा सिनेमा नाकारल्याचा किंग खानला होतो आजही पश्चाताप, शाहरुखला अजय देवगणनं केलेलं रिप्लेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:48 IST

Shah Rukh Khan And Ajay Devgan :शाहरुख खानने हा सिनेमा नाकारला आणि अजय देवगणची लागली वर्णी

अजय देवगण (Ajay Devgan), रवीना टंडन (Raveena Tandon) आणि सुनील शेट्टी (Suniel Shetty) यांचा १९९४ साली रिलीज झालेला 'दिलवाले' (Dilwale Movie) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट ठरला. मात्र, चित्रपटाचे लेखक करण राजदान यांनी अलिकडेच सिद्धार्थ कन्ननशी केलेल्या संवादात खुलासा केला की, यापूर्वी त्यांनी शाहरुख खान(Shah Rukh Khan)ला अजयची भूमिका ऑफर केली होती, मात्र त्याने ती नाकारली होती. त्यांनी हेही सांगितले की, हा चित्रपट चालणार नाही असे सुभाष घई यांना वाटत होते आणि त्यांचा चित्रपट रवीनाचा १३ वा फ्लॉप असेल असे सांगत लोक त्यांची कशी खिल्ली उडवत होते. 

दिलवालेच्या कास्टिंगची आठवण करून देताना करण राजदान म्हणाले की, "मी अजय देवगणला दिलवाले चित्रपटात भूमिका दिली होती. ती शाहरुख खानसाठी लिहिली होती. मी कथा सांगण्यासाठी त्याच्या घरी गेलो होतो, आणि त्याला स्क्रिप्ट आवडली. तो मला फक्त एकच म्हणाला, 'करण, शेवटी नायिकेने दुसऱ्या मुलासोबत जायला पाहिजे.' मी माझ्या चित्रपटाचा शेवट बदलण्यास नकार दिला. तो म्हणाला, 'मी नाही करू शकत, जर मी त्याग करू शकत नाही.' मी अजयच्या सेटवर गेलो आणि त्याला भूमिकेची ऑफर दिली. त्याने ही ऑफर स्वीकारली. मग आम्ही सुनील शेट्टीला दुसरा मुख्य अभिनेता म्हणून कास्ट केले.

''रवीना टंडनचा हा १३वा फ्लॉप ठरेल''

ते पुढे म्हणाले, सुभाष घई हे दिलवालेने प्रभावित झाले नाहीत. ८०% शूटिंग पूर्ण झाल्यानंतर करणने चित्रपट निर्माते सुभाष घई यांना चित्रपट दाखवला, परंतु त्यांच्या प्रतिक्रियेने ते चकित झाले. ते मला म्हणाले की, 'तुला रडायचे असेल तर आता रड, कारण चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या दिवशी तरी तू रडणार आहेस.' मी का विचारलं, त्यावर ते म्हणाले की, 'तुझी अजय देवगणविरुद्ध काही तक्रार आहे का?' सुनील शेट्टीवर ते फारसे भाष्य करू शकले नाहीत, कारण तो नवीन होता, तर दुसरीकडे ते म्हणाले की, रवीना टंडनने जवळपास १२ फ्लॉप चित्रपट दिले होते, आता हा तेरावा होईल'. 

शाहरुखने कबुल केली चूक

मात्र, रिलीज झाल्यावर हा चित्रपट यशस्वी झाला आणि नंतर सुभाष घई यांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी करण यांनीहेदेखील सांगितले की, शाहरुखने नंतर त्यांना भेटून कशी मिठी मारली आणि शेवट बदलण्याची त्याची इच्छा चुकीची असल्याचे कबूल केले. चित्रपट निर्माते आपल्या दृष्टीकोणावर ठाम राहिल्याचा त्यांना आनंद आहे.

सिनेमाबद्दल

हॅरी बावेजा दिग्दर्शित आणि करण राजदान लिखित, रोमँटिक ॲक्शन दिलवाले चित्रपटात अजय देवगण, सुनील शेट्टी, रवीना टंडन आणि परेश रावल प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाने बंपर ओपनिंग केली होती आणि सुपरहिट ठरला होता. त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये त्याचा समावेश करण्यात आला.

टॅग्स :शाहरुख खानअजय देवगण