या विमानाने ‘कबाली’ पाहायला पोहोचणार रजनीचे चाहते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 15:53 IST
सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘कबाली’ प्रदर्शनापूर्वी जोरदार चर्चेत आहे. ‘कबाली’चा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी बेंगळुुरातील अनेक जण विमानाने चेन्नईला ...
या विमानाने ‘कबाली’ पाहायला पोहोचणार रजनीचे चाहते!
सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘कबाली’ प्रदर्शनापूर्वी जोरदार चर्चेत आहे. ‘कबाली’चा फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी बेंगळुुरातील अनेक जण विमानाने चेन्नईला जाणार आहेत. रजनीचे चाहते ज्या विमानाने चेन्नईला जाणार आहेत, ते विमान चांगलेच सजवण्यात आजे आहे. ‘कबाली’चे पोस्टर या विमानावर चितारण्यात आले आहे. या खास विमानात ‘कबाली’च्या फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहायला जाणाºया प्रेक्षकांखासाठी कबाली स्पेशन मेन्यू असणार आहे. संबंधित विमान ज्या कंपनीचे आहे, या कंपनीची अशी दहा विमाने दहा शहरांतून चेन्नईला पोहोचतील. या सर्व विमानातून रजनीचे चाहते ‘कबाली’ पाहण्यासाठी चेन्नईला पोहोचतील. यात बेंगळुरू, नवी दिल्ली, गोवा, पुणे व कोच्ची आदी शहरांचा समावेश आहे. ‘कबाली’ मध्ये रजनीकांत एका गँगस्टरची भूमिका साकारत आहे.