Join us  

'जुम्मा चुम्मा गर्ल' किमी काटकरचा मुलगा आहे हिरोसारखा हॅंडसम, फॅन्स म्हणाले - आईची सावली आहे मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 3:15 PM

Kimi Katkar: किमीने 1992 मध्ये प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि सिने निर्माता शांतनु शौरीसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगा सिद्धांतही आहे. किमी काटकरचा मुलगा सिद्धांत याचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे.

'हम' सिनेमातील 'जुम्मा जुम्मा' गाणं तर सर्वांनाच आठवत असेल. ज्यात अमिताभ बच्चन आणि किमी काटकर (kimi Katkar) यांनी परफॉर्म केलं होतं. या गाण्यात दोघांची जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळाली होती. या गाण्यानंतर तर किमी काटकर घराघरात लोकप्रिय झाली होती. पण आश्चर्याची बाब म्हणजे या सिनेमानंतर तिने फिल्म इंडस्ट्रीला अलविदा केलं. पण आजही फॅन्सना तिची आठवण येते. आता ती बॉलिवूडपासून दूर आपल्या फॅमिलीसोबत जास्त वेळ घालवते. किमीने 1992 मध्ये प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि सिने निर्माता शांतनु शौरीसोबत लग्न केलं. त्यांना एक मुलगा सिद्धांतही आहे. किमी काटकरचा मुलगा सिद्धांत याचा फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे.

किमी काटकरचा मुलगा सिद्धांत शौरीचा मुलगा फारच हॅंडसम दिसतोय. त्याचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. यात तो त्याची आई किमी काटकरसोबत दिसत आहे. दोघांमधील स्ट्रॉंग बॉन्डींगही बघायला मिळत आहे. मात्र, किमी काटकरचा मुलगा आई-वडिलांप्रमाणे फिल्म इंडस्ट्रीत नाही. तो वेगळं काहीतरी करतोय. तो नेहमीच लाइमलाईटपासून दूर राहतो. 

किमी काटकरने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमात काम केलं. ज्यात  'जैसी करनी वैसी भरनी', 'टार्जन', 'तेजा', 'काला बाजार', 'दरिया दिल', 'धर्मयुद्ध', 'सोने पे सुहागा' सारख्या सिनेमांचा समावेश आहे. 1992 मध्ये गोविंदासोबत आलेला तिचा 'हमला' हा सिनेमा शेवटचा होता. आता तिचा मुलगा फिल्म इंडस्ट्रीत येणार की नाही याकडे तिच्या फॅन्सचं लक्ष लागलं आहे.

टॅग्स :किमी काटकरबॉलिवूड